आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ.दाभोलकरांनंतर सचिन अणदुरेला पानसरे खून प्रकरणात होणार अटक; अमोलने अणदुरेला पिस्तूल दिल्याचा सीबीआयचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे  - अंनिसचे कार्याध्यक्ष डाॅ.नरेंद्र दाभाेलकर यांच्या खून प्रकरणात संशयित हल्लेखाेर म्हणून सीबीआयने सचिन अणदुरे आणि शरद कळसकर यांना अटक करून त्यांच्याविरोधात न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले आहे. दरम्यान, काेल्हापूर येथील काॅ. गाेविंद पानसरे यांच्या खून प्रकरणात आैरंगाबादचा रहिवासी असलेल्या सचिन अणदुरे याला पानसरे प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) येरवडा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार सोमवारी अणदुरेला ताब्यात घेण्यास एसआयटीने परवानगी दिली आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसात अणदुरेला अटक करून काेल्हापूर न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच बंगळुरू येथील गौरी लंकेश प्रकरणातील दोन आरोपी कॉ. पानसरे प्रकरणात वर्ग करून त्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. सचिन अणदुरे आणि शरद कळसकर हे डाॅ. दाभाेलकर प्रकरणात हल्लेखाेर असल्याचा आराेप सीबीआयने ठेवला असून त्यांच्याविराेधात ४५० पानांचे दाेषाराेपपत्र फेब्रुवारी महिन्यात पुणे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. २० आॅगस्ट २०१३ राेजी डॉ. दाभाेलकर यांची हत्या झाली. त्या वेळी कळसकर आणि अणदुरे यांनी दाभाेलकर यांच्यावर गाेळ्या झाडल्या असल्या तरी ते दाभाेलकर यांना नेमके आेळखत नव्हते. त्यामुळे हत्येपूर्वी दाेघांनी त्यांना दाभाेलकर यांची आेळख पटवून दिली. त्यानंतरच प्रत्यक्ष गाेळीबार करण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींच्या जबाबातून समाेर आल्याचे सीबीआयने म्हटले आहे. या हत्येसाठी वापरण्यात आलेली दुचाकी अजून सापडली नाही.
 

अमोलने अणदुरेला पिस्तूल दिल्याचा सीबीआयचा दावा
बंगळुरू येथील पत्रकार गाैरी लंकेश खून प्रकरणातील मुख्य आराेपी अमाेल काळे याने दाभाेलकर यांच्यावर गोळ्या झाडणारा आैरंगाबादचा सचिन अणदुरे यास पिस्तूल व दुचाकी पुरवल्याचा दावा सीबीआयने केला आहे. याप्रकरणात अमाेल याने सनातन संस्थेचा साधक डाॅ. वीरेंद्रसिंग तावडे याच्या साेबतीने दाभाेलकर हत्येचा कट रचल्याचा आराेप आहे. सचिन याने तावडे याच्या सांगण्यावरून काॅ. पानसरे यांच्या खुनात ही सहभाग घेतल्याचा संशय आहे.

बातम्या आणखी आहेत...