आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल यांनी भरला 699 कोटींचा आगाऊ कर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल यांनी चालू आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या तिमाहीसाठी ६९९ कोटी रुपयांचा आगाऊ (अॅडव्हान्स) कर भरला आहे. यामध्ये अमेरिकी रिटेलर वॉलमार्टला फ्लिपकार्टच्या भागीदारी विक्रीतून मिळालेल्या रकमेमुळे लागलेल्या भांडवल वाढीच्या कराचाही समावेश आहे. प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, सचिनचे पार्टनर आणि कंपनीचे सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांनीदेखील वॉलमार्टला त्यांच्या भागीदारीची विक्री केली होती. मात्र, या दोघांनीही फ्लिपकार्टच्या शेअर विक्रीतून त्यांना किती रक्कम मिळाली याचा खुलासा केलेला नाही. 

 

याआधी प्राप्तिकर विभागाने सचिन आणि बिन्नी बन्सल यांच्यासह इतर शेअरधारकांना नोटीस पाठवली होती. यामध्ये फ्लिपकार्टच्या शेअर विक्रीतून मिळालेल्या रकमेवरील भांडवली वाढ कराचा खुलासा करण्याचे सांगितले होते. वॉलमार्टलाही नोटीस पाठवून प्राप्तिकर विभागाने फ्लिपकार्टच्या विदेशी शेअरधारकांच्या भांडवली वाढीवर विथहोल्डिंग कर भरण्यास सांगितले होते. गेल्या वर्षी नऊ मे रोजी वॉलमार्टने १६ अब्ज डॉलरमध्ये फ्लिपकार्टमधील ७७ टक्के शेअर खरेदी केले होते. कंपनीने ७ सप्टेंबरला प्राप्तिकरला ७,४३९.४० कोटी रुपये विथहोल्डिंग कर भरला होता.