आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...म्हणून सचिन यांना एक सेलिब्रिटी असल्याचा आला होता राग, या खास व्यक्तीच्या आठवणींने गहिवरले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  अभिनेता जितेंद्र जोशी होस्ट करत असलेल्या  'दोन स्पेशल' या कार्यक्रमात या आठवड्यात हजेरी लावली आहे अभिनेते-दिग्दर्शक-गायक सचिन पिळगांवकर आणि गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी. दोघांनीही जितेंद्र जोशींसोबत दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. यावेळी सचिन पिळगांवकर यांनी काही कधी न सांगितलेले किस्से, आठवणी मंचावर सांगितल्या.

  • वडिलांचा फोटो दाखवला तेव्हा झाले अत्यंत भावूक...

या मंचावर सचिन पिळगांवकर यांना त्यांच्या वडिलांचा फोटो दाखवण्यात आला. वडिलांचा फोटो बघून सचिन अत्यंत भावूक झाले. यावेळी त्यांनी वडिलांना हार्ट अटॅक आला तेव्हा काय घडले होते तेही सांगितले. सचिन यांनी सांगितले, "पप्पा तुम्हाला माझ्या समोर अटॅक आला. तुमची अवस्था बघून मी बाहेर पडलो. तिथे नर्सेस उभ्या होत्या. त्यांना मी ओरडून सांगितलं, डॉक्टरांना बोलवा, माझ्या वडिलांना अटॅक आला आहे आणि त्यांनी माझ्याकडे बघून म्हटलं, असे सचिन सचिन... त्या दिवशी मला एक सेलिब्रिटी होण्याचा मला राग आला होता." सचिन यांना भावूक झालेले पाहून अवधूत गुप्ते यांनी त्यांचे सांत्वन केले. 

सचिन आणि त्यांच्या पत्नी सुप्रिया यांचं  ऑनस्क्रीन नातं त्यांच्या चाहत्यांनी अनुभवलंय पण घरी त्यांचं नातं कसं आहे? हे देखील सचिन यांनी या मंचावर सांगितलं.  

  • श्रियाने वडिलांना म्हटले...

कार्यक्रमात या दोघांसोबत प्रश्नउत्तरांचा गेम देखील रंगला. सचिन पिळगांवकर यांनी श्रिया आणि त्यांच्यामध्ये घडलेला एक किस्सा सांगितला. जितेंद्र जोशी यांनी जेव्हा सचिन पिळगांवकर यांना “तुम्ही कधी श्रियाला सांगितले आहे का हे कर, किंवा हे करू नकोस? असे विचारले. त्यावर ते म्हणाले अजिबात नाही, त्या भानगडीत मी कधीच पडलो नाही. ती ऐकणार नाही आणि तिने ऐकू पण नाही असे मला वाटते. त्यावर अवधूत गुप्तेंनी सांगितले, जेव्हा आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा मी आणि माझ्या बायकोने श्रियाला प्रोत्साहन दिले की, तू अभिनय करायला पाहिजे. त्यावर सचिन पिळगांवकर म्हणाले, ‘याने सांगितल्यावर माझ्या डोक्यामध्ये सूत्र सुरू झाली होती आणि मी परत येताना तिला विचारले की, मी विचार करतो आहे चित्रपट बनावायचा तर तू करशील का? त्यावर तिने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटेल ती त्यावेळेस म्हणाली “मला स्क्रिप्ट द्या मी ठरवते.    सचिन पिळगांवकर यांनी दोन स्पेशलच्या मंचावर गुरुदत्त साहेब यांच्यासोबत झालेल्या भेटीची आठवण सांगितली. गुरुदत्त साहेब यांच्या निधनानंतर आत्मारामजी म्हणजे गुरुदत्तजी यांचे धाकटे बंधु त्यांचा फोन का आला आणि पुढे ते काय म्हणाले? यासह अनेक न ऐकलेले किस्से या कार्यक्रमाच्या गुरुवार आणि शुक्रवारच्या भागामध्ये प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत.   

बातम्या आणखी आहेत...