आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी सिनेइंडस्ट्रीतील परफेक्ट कपल म्हणून सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांना ओळखले जाते. 'नवरी मिळे नव-याला' या सिनेमाच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि ही रिल लाईफ जोडी रिअल लाईफमध्ये एकत्र आली. 16 ऑगस्ट रोजी सुप्रिया यांचा वाढदिवस होता. त्यांनी वयाची 51 वर्षे पूर्ण केली. तर आज म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी सचिनजींचा वाढदिवस असून त्यांनी वयाची 61 वर्षे पूर्ण केली आहेत. या दोघांच्या वयात दहा वर्षांचे अंतर आहे. 17 ऑगस्ट 1957 ही सचिनजींची तर 16 ऑगस्ट 1967 ही सुप्रिया यांची जन्मतारीख आहे. या दाम्पत्याला श्रिया ही एकुलती एक लेक आहे.
सचिन आणि सुप्रिया 'नवरी मिळे नव-याला' या सिनेमाच्या सेटवर प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केले, हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र सुप्रिया यांना हा सिनेमा कसा मिळाला, दोघांच्या लग्नात काय घडले होते, ज्यामुळे सुप्रिया वैतागल्या होत्या, हे सर्वकाही आज आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून सांगत आहोत.
- सुप्रिया यांचे माहेरचे आडनाव सबनिस आहे. सुप्रिया सबनीसांच्या घरात अतिशय सांस्कृतिक आणि मध्यमवर्गीय वातावरणात वाढल्या.
- मुंबईच्या 'परांजपे विद्यालयात' शिकणा-या सुप्रिया त्यांच्या बाबांच्या प्रोत्साहनामुळे वक्तृत्व, कथाकथन, नाटय अशा अनेक स्पर्धांत भाग घ्यायच्या.
- सुप्रिया पाचवीत असतांना दर शनिवारी त्यांचे वडील शाळेतला स्पर्धांचा सुचना फलक बघायला जायचे. एका शनिवारी न जमल्यामुळे सुप्रिया यांना स्पर्धेत भाग घेता आला नव्हते.
- उशीर झाला या कारणास्तव वर्गशिक्षिकेने स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला.
काय केले होते सुप्रिया यांच्या वडिलांनी...
- सुप्रिया यांचे बाबा त्यांना घेऊन थेट मुख्यध्यापिकेकडे गेले आणि सुप्रिया यांना पाठ असलेली नाटयछटा त्यांना ऐकवली.
- मुख्याध्यापिकांनी सुप्रियामधील हे गुण ओळखून दहावीपर्यंत पुढील प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्यास त्यांना प्रोत्साहन दिले.
- अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे आणि सुधा करमरकर यांच्यासारखे दिग्गज सुप्रिया यांना परिक्षक आणि मार्गदर्शक लाभले होते.
सचिनजींच्या आईनेच केली होती 'नवरी मिळे नव-याला'साठी सुप्रियाच्या नावाची शिफारस...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.