Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Sachin, Sharad had did practice behind the makbara

सचिन, शरदने मकबऱ्याच्या मागे केला गाेळीबाराचा सराव; अाता मुहूर्त काढा... पांगारकरला दिला निराेप

प्रतिनिधी | Update - Sep 14, 2018, 06:20 AM IST

डाॅ. नरेंद्र दाभाेलकर हत्येप्रकरणी अटक केलेला सचिन अणदुरे व शरद कळसकर यांनी हत्येच्या अाठ दिवस अाधी अाैरंगाबादेतील बीबी

  • Sachin, Sharad had did practice behind the makbara

    औरंगाबाद- डाॅ. नरेंद्र दाभाेलकर हत्येप्रकरणी अटक केलेला सचिन अणदुरे व शरद कळसकर यांनी हत्येच्या अाठ दिवस अाधी अाैरंगाबादेतील बीबी का मकबऱ्याच्या मागे निर्जन भागात गाेळीबाराचा सराव केला हाेता, अशी माहिती तपासात समाेर अाली. बुधवारी पथकाने या भागाची पाहणी करून नकाशा सीबीअायला पाठवला. ‘सराव पूर्ण झालाय, अाता मुहूर्त काढा’ असा सांकेतिक निराेपही या दाेघांनी जालन्याचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला पाठवला हाेता, अशीही माहिती सूत्रांनी दिली.


    सचिन व शरद सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत. त्यांनी दाभोलकरांची हत्या करण्यासाठी चार ठिकाणी सराव केल्याचे स्पष्ट झाले अाहे. मकबऱ्याच्या जवळील सरावात दोघांचेही निशाणे अचूक जागेवर लागल्याने त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. या माहितीच्या आधारावर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सचिनने सांगितलेल्या जागेची पाहणी करून अहवाल सीबीआयला पाठवला.

Trending