आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाेनी, केदार जाधवने केली निराशा; संघातील मधल्या फळीवर सचिन तेंडुलकरचे टीकास्त्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साऊथम्पटन - अफगाणिस्तान संघाविरुद्ध सामन्यात टीम इंडियाने केलेल्या सुमार फलंदाजीवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने प्रचंड नाराजी व्यक्त केली. यादरम्यान त्याने मधल्या फळीतल्या फलंदाजांवर चांगलीच टीका केली. त्याच्या मते,  धाेनी आणि युवा फलंदाज केदार जाधव यांनी सामन्यात घाेर निराशा केली. धाेनीने सीनियर असल्याची अद्याप महत्त्वपूर्ण अशी जबाबदारीची भूमिका बजावली नाही. भारताने शनिवारी विश्वचषकातील अफगाणिस्तानचा पराभव केला. भारताने हा रंगतदार सामना ४९.५ षटकांत ११ धावांनी जिंकला. 


‘माझी या सामन्यादरम्यान माेठी निराशा झाली. या सामन्यात भारताच्या फलंदाजांना माेठी कामगिरी करता आली असती.  केदार आणि धाेनीला अनुभव आहे. मात्र, तरीही त्यांनी संकटात असताना अत्यंत ढिसाळ फलंदाजी केली. त्यामुळेच संघाला स्पिन गाेलंदाजांविरुद्ध ३४ षटकांत  ११९ धावा काढता आल्या. काेहली बाद झाल्यानंतर ३० ते ४५ षटकांपर्यंत संथगतीने धावा काढल्या गेल्या. प्रत्येक षटकात दाेन ते तीन डाॅट बाॅल गेले. या फलंदाजांना सुरुवातीच्या सामन्यात संधी मिळाली नाही. त्यामुळे  त्यांच्यावर दबाव  हाेता. समाेरचा संघ  बलाढ्य नव्हता.  त्यांनी आव्हान कायम ठेवताना धावसंख्येला गती देण्याची गरज हाेती,’ अशा शब्दांत सचिनने टीमवर टीका केली.

बातम्या आणखी आहेत...