आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनचे विनोद कांबळीला अनोखे चॅलेंज!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या बालपणीचा मित्र विनोद कांबळी याला सचिन तेंडुलकरने एक अनोखे चॅलेंज दिले आहे. आता तुम्ही बुचकळ्यात नक्कीच पडला असाल, कारण सचिन आणि विनोद कांबळीने क्रिकेटमधून तर निवृत्ती घेतली आहे, मग असे कोणते चॅलेंज सचिनने कांबळीला दिले असेल? मग आम्ही तुम्हाला सांगतो काय आहे चॅलेंज… २०१७ मध्ये सचिनने एक गाणे गायले होते. त्या गाण्याचे बोल ‘क्रिकेट वाली बीट’ असे होते. आता या गाण्यासंदर्भातच सचिनने कांबळीला चॅलेंज दिले आहे.  ट्विटरवर सचिन तेंडुलकरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. सचिन आणि विनोद या व्हिडिओत एका क्रिकेट स्टेडियममध्ये बोलत उभे आहेत. विनोदला सचिन ‘क्रिकेट वाली बीट’ या गाण्याचे रॅप व्हर्जन गाण्याचे चॅलेंज देताना दिसत आहे. यासाठी विनोदला एका आठवड्याची सचिनने मुदत दिली आहे. सचिन आणि विनोद ‘क्रिकेट वाली बीट’ गाण्याबद्दल बोलताना दिसत आहेत. विनोदने हे गाण माहीत असल्याचे तेव्हा सांगितले. सचिन त्यावर विनोदला म्हणाला, मिस्टर कांबळी मी तुला ‘क्रिकेट वाली बीट’ हे गाणे रॅप करण्याचे चॅलेंज देतो. तुला त्यासाठी एक आठवड्याचा वेळ आहे. या गाण्याचे रॅप व्हर्जन २८ जानेवारीपर्यंत सर्वांना ऐकव. सचिनने दिलेले हे चॅलेंज ऐकल्यानंतर विनोद रॅप स्टाइलने डान्स करताना व्हिडिओत दिसत आहे. आता विनोद सचिनने दिलेले हे चॅलेंज पूर्ण करतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सचिन आणि प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी ‘क्रिकेट वाली बीट’ हे गाण एकत्र गायले होते.

बातम्या आणखी आहेत...