Home | Sports | From The Field | sachin tendulkar not play in westindies tour

सचिनचे वेस्टइंडीजला न जाण्याचे खरे कारण हे होते...

Agency | Update - May 31, 2011, 12:01 PM IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वेस्टइंडीज दौऱ्यासाठी एकदिवसीय संघातून नाव मागे घेतल्यानंतर कसोटीतूनही माघार घेतली आहे.

  • sachin tendulkar not play in westindies tour

    sa_250मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वेस्टइंडीज दौऱ्यासाठी एकदिवसीय संघातून नाव मागे घेतल्यानंतर कसोटीतूनही माघार घेतली आहे. सचिनने दुखापतीचे कारण दिले असले तरी, प्रत्यक्षात त्याची माघार घेण्याचे कारण सचिनच्या मुलांनी सुट्टी आपल्या बरोबर घालविण्याचे सचिनला सांगितल्याने त्याने या दौऱ्यातून माघार घेतली आहे.

    एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सचिन म्हणाला, मी परिवारासोबत वेळ घालवायचा आहे. खासकरून मुलांबरोबर राहून मला मजा लुटायची आहे. मुलांबरोबर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मला एक वर्षभर वाट पहावी लागते. माझ्या या निर्णयाने सारा आणि अर्जुन खूष आहेत. त्यांना मी या निर्णयाबाबत कोणतीही कल्पना दिली नव्हती.

    वेस्टइंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून आराम घेताना सचिनने आपल्याला कसोटी मालिकेतूनही आराम मिळावा असे सांगितले होते. या दौऱ्यातून माघार घेतल्याने सचिनला इंग्लंडविरुद्ध लॉर्डसवर क्रिकेट कारकिर्दीतील १०० वे शतक झळकाविण्याची संधी असणार आहे.Trending