आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट डेस्क- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठानचा मुलगा इमरानसोबत मस्ती आणि बॉक्सिंग करताना दिसला. इरफानने याचा एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत सचिन लहानग्या इमरानसोबत बॉक्सिंग करताना दिसत आहे. इरफानने व्हिडिओसोबत कॅप्शन लिहीले की, 'त्याला आता माहिती नाही, त्याने काय केले. तो मोठा झाल्यावर त्याला कळेल.'
व्हिडिओत सचिन सुरुवातीला इमरानसोबत आपली उंची मोजताना दिसत आहे. त्यानंतर इमराना सचिनला बुक्क्या मारतो आणि सचिनदेखील त्याच्यासोबत बॉक्सिंग करतो. सचिननेही हा व्हिडिओ आपल्या ट्विवटर अकाउंटवर पोस्ट केला आहे.
सध्या सचिन तेंडुलकर आणि इरफान पठान रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये खेळत आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये पाच संघामध्ये टी-20 टूर्नामेंट होत आहे. यात भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रीकेतील माजी क्रिकेटर खेळत आहेत. रोड सेफ्टीबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी या टुर्नामेंटचे आयोजन केले आहे. टूर्नामेंटमध्ये 7 मार्चला झालेल्या सामन्यात इंडिया लीजेंड्सने वेस्टइंडीज लीजेंड्सवर सात विकेट्सची मात केली. वेस्टइंडीज लीजेंड्सने पहिले फलंदाजी करताना 20 ओवरमध्ये 8 विकेट्च्यावर 150 धावा काढल्या. वेस्टइंडीजकडून शिनारायण चंद्रपालने 61 धावा काढल्या. इंडिया लीजेंड्सकडून जहीर खान, मुनाफ पटेल आणि प्रज्ञान ओझाने प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. इंडिया लीजेंड्सने 18.2 ओव्हर मध्ये 3 विकेट्स गमावून सामना आपल्या नावावर केला. सामन्यात वीरेंद्र सहवागने दमदार 74 तर सचिने 36 धावा केल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.