आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड कप फायनलमध्ये बाउंड्रीच्या नियमावर बोलला सचिन, आणखी एक सुपर ओव्हर टाकायला हवा होता!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - वर्ल्ड कपच्या फायनलवरून वाद सुरू असताना त्यावर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपले मत मांडले आहे. बाउंड्रीवरून विजेता घोषित करण्यापेक्षा आणखी एक सुपर ओव्हर व्हायला हवा होता असे सचिन म्हटले आहे. फायनलमध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंडने सम-समान धावा काढल्या. यानंतर सुपर ओव्हरमध्ये सुद्धा सामना टाय ठरला. त्यानंतर आयसीसीने बाउंड्री काउंटच्या नियमांचा दाखला देत इंग्लंडला विजेता घोषित केले. दोन्ही संघांची कामगिरी अतिशय चांगली होती. तर दुसरीकडे, न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टेड म्हणाले, की पुढच्या वेळी फायनलमध्ये अशी परिस्थिती उद्भवल्यास किंवा सामना टाय ठरल्यास दोन्ही संघांना ट्रॉफी वाटून द्यायला हवी. तर श्रीलंकेला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे कोच डेव्ह व्हॉटमोर यांच्या मते, त्यांनी बाउंड्री काउंटचा नियम पहिल्यांदाच ऐकला आहे.

 

सचिन तेंडुलकरच्या मते, "फायनलमध्ये निर्णयासाठी बाउंड्री काउंटच्या ठिकाणी आणखी एक सुपर ओव्हर टाकायला हवा होता. ही केवळ एका वर्ल्ड कप फायनलची गोष्ट नाही. प्रत्येक सामना महत्वाचा असतो. फुटबॉलमध्ये सुद्धा प्रत्येक नॉक-आउट सामन्यासाठी एक्सट्रा टाईम दिला जातो." तर व्हॉटमोर यांनी सांगितले, की "फायनलमध्ये वर्ल्ड कपची ट्रॉफी न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये वाटून द्यायला हवी होती. फायनलमध्ये कुणीच विजेता ठरलेला नाही. मला बाउंड्री काउंटचा हा नियम यापूर्वी माहितच नव्हता." तर न्यूझीलंडचे कोच स्टेड म्हणतात, "जेव्हा नियम बनवण्यात आला तेव्हा विचार केला असावा की वर्ल्ड कपची फायनल मॅच अशी होईल असे वाटलेच नसावे. किमान आता तरी या नियमावर विचार करायला हवा. 100 ओव्हर खेळल्यानंतरीही सामना बरोबरीवर आणणे आणि त्यानंतरही आपण पराभूत झाल्याचे कळणे अतिशय निराशाजनक आहे." एवढेच नव्हे, तर या सामन्यात ओव्हर थ्रोनंतर दिलेल्या 6 धावा प्रत्यक्षात 5 होत्या, या मुद्द्यावरून सुद्धा वाद सुरू आहेत. अनेकांनी या वर्ल्डकपचा खरा विजेता इंग्लंड नव्हे, तर न्यूझीलंड असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...