आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी अंजलीसोबत प्रथमच दर्शनासाठी येथे गेला होता सचिन, मूळमंत्राचा अर्थ जाणून घेतल्यानंतर परिवारासाठी मागितली सुख-शांती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अमृतसर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसोबत अमृतसर येथील दरबार साहिब यांच्या दर्शनासाठी गेले होते. दरबाह साहिब येथे येण्याची त्यांची पहिलीच वेळ होती. याआधी ते लहानपणी आले होते. पण आता त्यांना ती गोष्ट आठवत नसल्याचे त्यांनी सांगितले. 

दरबार साहिब येथे दर्शन घेण्यापूर्वी एसजीपीसी प्रवक्ते दलजीत सिंह बेदी यांना सचिन आणि अंजली यांना सिरोपा, दरबार साहिबचे मॉडल आणि धार्मिक पुस्तके भेट दिली. यानंतर एसजीपीसी सुरक्षा रक्षकांच्या सहाय्याने ते दर्शनाला गेले. दरबारमध्ये गेल्यावर सचिनच्या चेहऱ्यावर भक्ती दिसत होती. यावेळी दलजीत सिंह बेदी यांनी सचिनला संपूर्ण दरबार साहिबची परिक्रमा करत दरबार साहिब आणि शिखांच्या इतिहासाबद्दल माहिती दिली. परिक्रमा दरम्यान एका ठिकाणी विश्राम करत गुरूवाणी ऐकली. यादरम्यान अंजली आणि पोलिस कमिश्नर एसएस श्रीवास्तव यांची पत्नी डिम्पल श्रीवास्तव उपस्थित होते. 


सचिनने कहाड प्रसादाचा आनंद घेत त्याविषयी जाणून घेतले. प्रसाद घेतल्यानंतर गुरुघर येथे जाऊन आपल्या परिवाराच्या सुख शांतीसाठी प्रार्थना केली. तेथे त्यांना मूलमंत्र विषयी सांगण्यात आले. मूळमंत्र ऐकल्यानंतर त्याचा अर्थ समजून घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर हरच्या पौडीवर जाऊन हस्तलिखीत स्वरुपाचे दर्शन घेतले. 

 

जालियनवाला बागेला दिली भेट, शहीदांना वाहिली श्रद्धांजली

दरबार साहिब येथून निघाल्यानंतर सचिन जालियनवाला बागकडे गेले. पण वेळ संपल्यामुळे बाग बंद करण्यात आली होती. सचिनने व्यवस्शापनाला गेट उघडण्याची विनंती केली असता गेट पुन्हा उघडण्यात आले. जालियनवाला बागेत 20 मिनीटे थांबले होते. यावेळी त्यांनी अमर ज्योती आणि शहीद स्मारकाला वंदन करून श्रद्धांजली अर्पण केली. 

बातम्या आणखी आहेत...