आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेंडूलकरचा डायहार्ड फॅन सुधीरजवळ नव्‍हते दुबईला जाण्‍यासाठी पैसे, पाकिस्‍तानच्‍या 'चाचा शिकागो'ने उचलला सर्व खर्च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - सचिन तेंडुलकरचा डायहार्ड फॅन असलेला सुधीर गौतम टीम इंडियाच्‍या जवळपास प्रत्‍येक सामन्‍यात तिरंगा फडकावताना दिसतो. सध्‍या चालु असलेल्‍या एशिया कपमध्‍येही टीमला सपोर्ट करण्‍यासाठी तो संयुक्‍त अरब अमीरातीत (युएई) पोहोचला आहे. मात्र त्‍याला येथे आणण्‍यात सर्वात मोठा वाटा आहे पाकिस्‍तान टीमचे फॅन असलेले चाचा शिकागो यांचा.  


दुबईला जाण्‍यासाठी नव्‍हते पैसे
सुधीरजवळ दुबईला जाण्‍यासाठी आणि तेथे राहण्‍यासाठी पैसे नव्‍हते. तेव्‍हा त्‍याला मदत आली ती पाकिस्‍तानमधून. पाकिस्‍तानच्‍या चाचा शिकागो या नावाने ओळखल्‍या जाणा-या क्रिकेट फॅनने त्‍याला फोन करून त्‍यांनी सुधीरसोबत एशिया कपला जाण्‍याची योजना बनवली. जेव्‍हा चाचा शिकागो यांना कळाले की, सुधीरजवळ देशातून बाहेर पडण्‍याऐवढेही पैसे नाही, तेव्‍हा त्‍यांनी स्‍वत: त्‍याच्‍या विमानाचे तिकिट काढले व त्‍याच्‍यासाठी हॉटेलही बुक केले.
- नंतर याबद्दल माध्‍यमांशी बोलताना चाचा शिकागो यांनी सांगितले की, 'माझ्या मित्राच्‍या प्रेमापोटी मी हे केले. मी फार श्रीमंत नाही. मात्र माझे मन मोठे आहे. फोन करून मी सुधीरला कळवले की, तु फक्‍त ईकडे ये, मी येथे सर्व व्‍यवस्‍था करतो.' तर सुधीरने म्‍हटले आहे की, 'मी केवळ व्हिसा काढला. नंतर चाचानेच मला तिकिट काढून दिले. ऐवढेच नव्‍हे तर त्‍यांनी माझ्यासाठी हॉटेलचीही व्‍यवस्‍था केली.


भारत-पाक सामन्‍यापूर्वी घेतला सेल्‍फी
एशिया कप सुरू होण्‍यापूर्वीच सुधीर व चाचा युएईला पोहोचले. येथील रस्‍त्‍यावर दोघेही मनसोक्‍त फिरले व सेल्‍फीही घेतल्‍या. त्‍यांच्‍यासोबत बांग्‍लादेशचा शोएब टायगरही होता. बुधवारच्‍या भारत-पाक सामन्‍यात दोघेही मैदानात उपस्थित होते व यादरम्‍यान दोघांनीही एकत्र बसून आपापल्‍या टीमला सपोर्ट केला.   
 

 

    

बातम्या आणखी आहेत...