आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना त्यांच्या स्वप्नांच्या मागे धावू द्या, सचिन तेंडुलकरचा पालकांना संदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने पालकांना एक खास संदेश दिला आहे. सचिन म्हणाला की, मुलांवर दबाव न टाकता त्यांना त्यांच्या स्वप्नांच्या मागे धाऊ द्या, त्यांना स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत करा. त्यागराज स्टेडियममध्ये आयोजित बाल दिवसाच्या कार्यक्रमात सचिन बोलत होता. तो पुढे म्हणाला,  मुले चुका करतात पण त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना समजून सांगितले पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभे राहा, त्यांना उडू द्या, त्यांना त्यांच्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करू द्या. 


सचिनने पुढे म्हटले, आपल्या आयुष्यातही समस्या असतात, पण आपण आपल्या धेयावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, आपल्या आयुष्यातील अडचणींचे समाधान शोधले पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी तयारी महत्त्वाची आहे. चांगल्या तयारी शिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाहीत.

 

यशस्वी होण्यासाठी शॅार्टकट नसतो, आपल्या कामाप्रती प्रामाणिकपणा आणि कटिबद्धता दाखवल्यास आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. त्यामुळे एक दिवस तुम्ही तुमच्या आई-वडिलांचे नाव मोठे कराल. मुलांना संबोधित केल्यानंतर सचिनने त्यांच्यासोबत फुटबॉल मॅच एन्जॉय खेळली.

 

बातम्या आणखी आहेत...