आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sacred Games 2: Pankaj Tripathi's Guru Roll Is Based On Spiritual Guru Rajneesh Osho

Sacred Games 2: आध्यात्मिक गुरु रजनीश ओशोवर आधारित आहे पंकज त्रिपाठींचा गुरुजीता रोल, 15 ऑगस्ट रिलीज होणार वेबसिरीज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क - नेटफ्लिक्सची ओरिजनल वेब सीरीज सॅक्रेड गेम्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या वेबसीरीजमध्ये पंकज त्रिपाठी पार पाडत असलेली गुरुजीची भूमिका पहिल्या सीझनपासून लोकप्रिय राहिली आहे. सीरीजचा दुसरा, सीझन ऑन एअर होण्यापूर्वी पंकज त्रिपाठीची ही भूमिका ओशो रजनीश यांच्याशी प्रेरित असल्याचे समजले. 

 

गुरुजीचे पात्र लिहिताना ठेवले लक्ष
एंटरटेनमेंट पोर्टल मिड डे च्या वृत्तानुसार पंकज त्रिपाठीची भूमिका 80 च्या दशकातील लोकप्रिय ओशो रजनीश यांच्याकडून प्रेरित आहे. पंकजचा ही भूमिका लिहिताना ओशोला समोर ठेवण्यात आले होते. या वेबसीरीजमध्ये पंकज त्रिपाठी व्यतिरिक्त सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, कल्कि कोचलीन आणि रणवीर शौरी यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

 

नेटफ्लिक्सने डॉक्यूमेंट्री देखील बनवलेली आहे
यापूर्वी नेटफ्लिक्सने ओशो रजनीश यांच्या एक डॉक्यूमेंट्री बनवलेली आहे. वाइल्ड कंट्री नावाने तयार करण्यात आलेल्या या डॉक्यूमेंट्रीला सगळीकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.  


83 मध्ये दिसणार पंकज
पंकज त्रिपाठी यांचा 83 हा आगामी चित्रपट आहे. भारताच्या विश्वचषक विजेत्यावर असलेल्या या चित्रपटात पंकज भारतीय संघाच्या व्यवस्थापकाची भूमिका पार पाडणार आहेत. याशिवाय पंकज गुंजन सक्सेनावर बनव असलेल्या चित्रपटात जान्हवी कपूरच्या वडिलांची भूमिका पार पाडत आहेत. ।

बातम्या आणखी आहेत...