आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत बकरी ईदला बक-यांची कुर्बानी रोखण्‍यासाठी हायकोर्टात याचिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बकरी ईदच्‍या दिवशी शहरात होणा-या बक-यांची कुर्बानी रोखण्‍यात यावी, अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्‍यात आली आहे. याचिकेत बकरी ईददरम्‍यान शहरात भरणा-या बकरा मंडीवरही बंदी घालावी, अशी मागणी करण्‍यात आली आहे. प्राण्‍यांच्‍या हितासाठी काम करणारी संस्‍था 'जीव मित्र ट्रस्‍ट' तर्फे ही याचिका दाखल करण्‍यात आली आहे.


काय म्‍हटले आहे याचिकेत?
- बकरी ईदला पशुंची कुर्बानी रोखण्‍यासाठी देवनार पशुवध गृहात (वधशाला) होणा-या शेळ्यामेंढ्यांच्‍या खरेदीविक्रीवर ताबडतोब बंदी घातली जावी, अशी मागणी याचिकेत करण्‍यात आली आहे. शेळ्यामेंढ्यांच्‍या खरेदीविक्रिसाठी देवनार वधशाला प्रसिद्ध असून हिला बकरा मंडीही म्‍हटले जाते. येथे वेगवेगळ्या जातींच्‍या बक-यांची लाखोंच्‍या किंमतीमध्‍ये विक्री केली जाते.


केंद्र सरकारने पशुधन निर्यातीवर घातली आहे बंदी
केंद्र सरकारने देशातील शेळ्यामेंढ्या बाहेरील देशात निर्यात करण्‍यावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. प्राण्‍यांसाठी काम करणा-या संस्‍थांनी मागणी केल्‍यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...