आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदगुरू जग्गी वासुदेव /या 5 गोष्टींमुळे मिळेल आयुष्यातील प्रत्येक पाऊलांवर यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनमंत्र डेस्क- खूप प्रयत्न करूनही आपल्याला कधी कधी असे वाटते की, आपल्याला यश मिळत नाहीये. पण अपयशामुळे आपण कधीच यशाचा मार्ग सोडायचा नसतो. म्हणजे आपण जे प्रयत्न करतो त्यात काही तरी बदल करणे आवश्यक असतो. याव्यतिरीक्त आपल्या विचारातही बदल करण्याची गरज असते. आपले यश हे आपल्या कामाची पद्धत, विचार आणि प्रयत्नावर अवलंबुन आहे. जाणून घ्या सदगुरूंचे 5 असे उपदेश ज्यांचे आचरण करून आपण आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतो.


नशीबावर अवलंबुन राहू नका, निर्धार पक्का करा
असे म्हणतात की आयुष्यात काही गोष्टी नशीबानेच मिळतात. काही गोष्टी अपघाताने व्यक्तींच्या आयुष्यात येतात. पण जर तुम्ही याच गोष्टींची वाट बघत बसलात तर आयुष्यभर आपल्याला असेच बसावे लागेल. कारण असे अपघात नेहमी होत नाहीत. त्यापेक्षा आपण एखाद्या गोष्टीचा निर्धार पक्का करून संपूर्ण शक्तीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायला पाहिजे. मग काही फरक पडत नाही की आपण काय केले आणि कसे केले. आपल्यासोबत जे काही होईल ते आपल्याला माहिती असेल, आणि जो परिणाम मिळेल ते कर्माचे फळ असेल. यामुळे आपण एक शांत आयुष्य जगु शकता.


अपयशाने कधीच हताश होऊ नका.
ध्येयाने वेडे झालेल्या लोकांना अपयश नावाची कोणतीही गोष्ट माहित नसते. जर तूम्ही दिवसभरात शंभर वेळेस खाली पडत असाल तर याचा अर्थ होतो की, आपल्याला आज शंभर धडे मिळाले. जेव्हा आपण ध्येयाला समर्पित होतो तेव्हा आपला मेंदू त्याच दिशेने काम करतो आणि जेव्हा आपला मेंदू ध्येयाच्या दिशेने चालतो तेव्हा आपल्या भावनासुद्धा त्यानुसार काम करतात. कारण जसे आपले विचार असतील, तशाच आपल्या भावनाही असतात. आणि एकदा का आपले विचार आणि भावना नियंत्रित झाल्या तर शरीर त्याच दिशेने काम करते. जेव्हा या चार गोष्टी एकाच दिशेने काम करतील तेव्हा आपले ध्येय गाठण्याची क्षमता आणखी वाढेल. 


नेहमी स्पष्ट विचारांनी काम करा
आपले विचार आत्मविश्वासापेक्षा अधिक स्पष्ट असायला हवे. जर आपल्याला गर्दीतून पुढे जायचे आहे, आपली दृष्टी योग्य ठिकाणी आहे, जर आपण पाहू शकत असाल की गर्दी कुठे उभी आहे. तर आपण सहज, कोणालाही न अडकता पुढे जाऊ शकता. पण आपली नजर योग्य जागेवर नसेल आणि फक्त विश्वास असेल तर आपल्याला वाटेत असेलल्या प्रत्येक व्यक्तीची अडचण होईल. लोकांना वाटते की, फक्त आत्मविश्वासाने आपल्यातील कमतरता भरून निघते. पण असे होत नाही. यश मिळवण्यासाठी व्यक्तीमध्ये आत्मविश्वासासोबत आपले ध्येय गाठण्यासाठी स्पष्ट विचारही असायला हवे.


आवडत नसलेले व्यक्ती आणि वस्तूंचा स्वीकार करा
आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव येतो. पण जास्त लोकांचे व्यक्तीमत्व दगडासारखे असते, जे त्यांच्या आयुष्यावर परिणाम करते. जर आपल्याला अशा परिस्थितीतून स्वतःचा बचाव करायचा असेल तर अशा व्यक्तीला आपला मित्र बनवा जो तुम्हाला आवडत नाही. त्या माणसासोबत अधिक वेळ घालवा, आपल्याला आवडत नसलेल्या कामांची सवय लावून घ्या. 


मला काय मिळेल याची चिंता सोडून द्या
मला काय मिळेल किंवा माझे कसे होईल, या गोष्टींची चिंता सोडून द्या. आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा. त्यामुळे आपल्यात एक असाधारण ऊर्जा निर्माण होईल. फक्त, माझे कसे होईल ही गोष्ट डोक्यातून काढून टाका आणि आपल्या क्षमतेनुसार चांगले काम करा. मग बघा आपल्या आयुष्यात कसा बदल होतो.

बातम्या आणखी आहेत...