Home | Flashback | Sadhna Was An Aunt of Kareena And Karisma

Remembrance : या अॅक्ट्रेसचे करीना-करिश्मासोबत होते खास नाते, अभिनयासोबतच हेअरस्टाइलसाठी होत्या प्रसिद्ध

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 02, 2018, 12:19 AM IST

विशिष्ठ हेअरकटमुळे स्टाइल आयकॉन ठरलेल्या साधना आज हयात असत्या तर त्यांनी वयाची 77 वर्षे पूर्ण केली असती.

 • Sadhna Was An Aunt of Kareena And Karisma

  मुंबई - गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे साधना शिवदासानी. आपल्या विशिष्ठ हेअरकटमुळे स्टाइल आयकॉन ठरलेल्या साधना आज हयात असत्या तर त्यांनी वयाची 77 वर्षे पूर्ण केली असती. 25 डिसेंबर 2015 रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकेकाळी चंदेरी दुनियेतील फॅशन आयकॉन राहिलेल्या एका देखण्या आणि गुणी अभिनेत्रीला सिनेसृष्टी मुकली.

  - साधना यांनी 60 ते 70 च्या दशकात जवळपास 35 हिट सिनेमांमध्ये काम केले होते. यात ‘वो कौन थी’, ‘मेरा साया’, ‘गीता मेरा नाम’, ‘दिल दौलत दुनिया’, ‘दुल्हा दुल्हन’, ‘हम दोनो’ या सिनेमांचा समावेश आहे. ‘गीता मेरा नाम’ या सिनेमाचे त्यांनी दिग्दर्शनही केले होते. ‘झुमका गिरा रे बरेली के बाजार में’, ‘आजा आई बहार दिल है बेकरार’, ‘लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो’ यांसारखी हिट गाणी त्यांच्यावर चित्रीत करण्यात आली होती.

  - 2 सप्टेंबर 1941 रोजी कराची, पाकिस्तान (त्याकाळी सिंध, ब्रिटिश इंडिया)मध्ये साधना यांचा जन्म झाला होता. प्रसिद्ध नृत्यांगणा साधना बोस यांच्या नावावर त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव साधना असे ठेवले होते.

  - साधना यांचे अभिनेत्री करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर यांच्यासोबत मावशी-भाचीचे नाते आहे. करीना-करिश्माची आई बबिता यांच्या साधना या चुलत बहीण होत्या.

  - बालकलाकाराच्या रुपात साधना यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. सर्वप्रथम त्या राज कपूर यांच्या 'श्री 420' या सिनेमातील 'मुड मुडके न देख मुड मुडके' या गाणयात कोरस गर्लच्या रुपात झळकल्या होत्या. त्यांनी 'अबना' या सिंधी सिनेमात काम केले होते.

  - बॉलिवूडमध्ये हिरोईनच्या रुपात त्या सर्वप्रथम आर के नायर यांच्या 'लव्ह इन शिमला' या सिनेमात झळकल्या होत्या.

  - आर. के. नायर यांच्या 'लव्ह इन शिमला' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान साधना यांचे आर. के. नायर यांच्यासोबत सूत जुळले आणि 7 मार्च 1966 रोजी त्यांनी लग्न केले. 1995 मध्ये अस्थमामुळे नायर यांचे निधन झाले होते.

  - साधन यांचे निवडक सिनेमे... 'हम दोनों' (1961), 'एक मुसाफिर एक हसीना' (1962), 'असली नकली' (1962), 'वो कौन थी' (1964), 'मेरा साया' (1966), 'इंतकाम' (1969), 'एक फूल दो माली' (1969), 'आप आए बहार आए' (1971), 'गीता मेरा नाम' (1972), 'अमानत' (1975) आणि 'तुलसी' (1985).

  आपल्या अभिनय, सौंदर्य आणि हेअरस्टाइलमुळे प्रसिद्ध झालेल्या साधना आता आपल्यात नाहीत, मात्र कलाकृतींच्या माध्यमातून त्या नेहमीच आपल्यात असतील. साधना यांची आठवणीतील छायाचित्रे बघा पुढील स्लाईड्सवर..

 • Sadhna Was An Aunt of Kareena And Karisma
 • Sadhna Was An Aunt of Kareena And Karisma
 • Sadhna Was An Aunt of Kareena And Karisma
 • Sadhna Was An Aunt of Kareena And Karisma
 • Sadhna Was An Aunt of Kareena And Karisma

Trending