आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाचा बळी देण्याचा संशय; जमावाने साधूस ठार मारले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कौशाम्बी - उत्तर प्रदेशातील कौशाम्बीजवळील कोसम गावात मंगळवारी जमावाने एका साधूला केलेल्या जबर मारहाणीत तो जागीच ठार झाला. या साधूने एका मुलाचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोेलिसांना याची माहिती मिळताच जखमी मुलगा व साधूला रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचार सुरू असताना त्या साधूचा मृत्यू झाला. पोलिसांनी पाच आरोपींसह ५० अज्ञात लोकांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. कौशाम्बी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोसम गावातील महाजन यांचा १० वर्षाचा मुलगा रिंकू सायंकाळी घाबरून घरी पळत आला होता. त्याने वडिलांना सांगितले, यमुना नदीच्या काठावर एका मंदिरातील साधूने त्याला व त्याचा भाऊ पिंटू (८) याला मंदिरात बोलावले. त्यांना बसण्यास सांगून अचानक पिंटूच्या गळ्यावर त्रिशुळाने वार केला. मी तेथून पळालो. हे एेकताच वडील व संतप्त गावकरी मंदिरात पोहोचले. 


मुलाच्या गळ्यावर रक्त पाहून जमाव बिथरला
मंदिरात पिंटूच्या गळ्यातून रक्त निघत असल्याचे पाहून लोकांचा राग अनावर झाला. त्यांनी साधूला बेदम मारहाण सुरू केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस धावतच तेथे पोहोचले. पोलिसांनी साधूला जमावाच्या तावडीतून सोडवले आणि त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान सोमवारी दुपारी मृत्यू झाला. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने या घटनेची माहिती घेतली,. पण त्यात फारसे हाती लागले नाही. अतिरिक्त एसपी अशोककुमार यांंनी दिलेल्या माहितीनुसार साेमवारी रात्री या हत्याकांडात ५ जणांसह ५० अज्ञात अारोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो साधू मुलांना पकडण्याचा प्रयत्न करत होता, अशी माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. 

बातम्या आणखी आहेत...