Maharashtra Special / मुंबईच्या एनआयए कोर्टात हजर झाल्या प्रज्ञा ठाकूर, न्यायाधिशांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या- मला माहीत नाही


कोर्टाने प्रज्ञा यांना दर आठवड्यात दोनवेळा हजेरी लावण्याचे आदेश दिले, गुरुवारी प्रकृती खराब असल्याने हजर होऊ शकल्या नव्हत्या

दिव्य मराठी वेब

दिव्य मराठी वेब

Jun 07,2019 03:28:00 PM IST

मुंबई- मालेगाव बॉम्ब ब्लास्ट आरोपी आणि भोपाळच्या नवनिर्वाचीत भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आज(शुक्रवार)दुपारी मुंबईच्या विशेष एनआयए कोर्टात हजर झाल्या. यावेळी न्यायाधिशांनी त्यांना दोन प्रश्न विचारले. त्याचे उत्तर प्रज्ञा यांनी, 'मला माहित नाही' असे दिले. प्रज्ञा यांना गुरुवारीच कोर्टात हजर राहण्याचे आदेश होते, पण प्रकृती खराब झाल्यामुळे त्या हजर राहू शकल्या नव्हत्या.


न्यायाधिशांच्या प्रश्नावर प्रज्ञा यांचे उत्तर
प्रज्ञा यांना विशेष एनआयए कोर्टाच्या न्यायाधिशांनी विचारले, "तुम्हाला माहित आहे का की, तुमच्या विरोधी पक्षाने किती साक्षीदार कोर्टात आणले आहेत?" यावर प्रज्ञा म्हणाल्या," मला माहित नाही."


न्यायाधिशांनी दुसरा प्रश्न विचारला, "आतापर्यंत साक्षीदारांनी म्हटले आहे 29 सप्टेंबर 2008 ला एक ब्लास्ट झाला होता, ज्यात अनेक लोकांचा जीव गेला होता. तुमचे यावर काय मत आहे?" यावर प्रज्ञा म्हणाल्या, "मला माहित नाही."


दर आठवड्याला दोनवेळा हजर राहण्याचे आदेश
3 जूनला मुंबईच्या एनआयए कोर्टाने प्रज्ञा यांना आठवड्यातून दोनवेळा कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. प्रज्ञा यांनी प्रकृतीचे आणि संसदेतील औपचारिकतेचे कारण देत सुट्टीची विनंती केली होती, पण विशेष न्यायालयाने अमान्य केली.

मालेगाव ब्लास्टमध्ये 7 लोकांचा मृत्यू झाला होता
29 सप्टेंबर 2008 मध्ये मालेगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता तर 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. सरकारने या प्रकरणाचा तपास एटीएसला दिला होता. 24 ऑक्टोबर, 2008 या प्रकरणात स्वामी असीमानंद, कर्नल पुरोहित आणि प्रज्ञा सिंह यांना अटक करण्यात आली होती, तर 3 आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले होते. नंतर हा तपास एनआयएकडे देण्यात आला. एप्रिल 2017 मध्ये साध्वी प्रज्ञा यांना 9 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर सशत्र जामीन मिळाला होता.

X
COMMENT