आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साध्वी प्रज्ञा वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : देशाच्या शत्रूला माझ्या वक्तव्याने फायदा होईल, याची जाणीव झाल्यामुळे वक्तव्य मागे घेतेय : प्रज्ञा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ/नवी दिल्ली - भाेपाळच्या भाजप उमेदवार आणि मालेगाव स्फोटाच्या आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी २६/११ हल्ल्याचे शहीद हेमंत करकरे यांना देशद्रोही संबोधले. प्रज्ञा म्हणाल्या, छळ केल्याने मी करकरेंना सर्वनाशाचा शाप दिला होता. त्यानंतर सव्वा महिन्यातच अतिरेक्यांनी त्यांना ठार केले. भाजपने मात्र, हे प्रज्ञा यांचे वैयक्तिक मत आहे, असे म्हटले. आयोगाने प्रज्ञा यांच्या वक्तव्याची चौकशी सुरू केली. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रज्ञा यांनी पोलिस छळाची तक्रार केली तर चौकशी करू.  

 

करकरेंचे काम कुटिलतेचे, देशद्रोही, धर्मविरोधी होेते : प्रज्ञा

चौकशी आयाेगाच्या सदस्याने करकरेंना मुंबईला बोलावले. मी मुंबई तुरुंगात होते. सदस्याने करकरेंना म्हटले, जर साध्वीविरोधात पुरावे नसतील तर तुरुंगात ठेवणे चुकीचे आहे. पण करकरे म्हणाले की मी पुरावे घेऊन येईन. कुठूनही आणीन, पण साध्वीला सोडणार नाही. करकरेंचे हे काम कुटिलतेचे, देशद्रोहाचे आणि धर्माच्या विरोधातील होते. ते मला प्रश्न विचारत तेव्हा मी म्हणत असे की, मला माहीत नाही, देवालाच माहीत. त्यांनी विचारले, पुरावे घेण्यासाठी देवाकडे जावे लागेल का? मी म्हटले- अगदी आवश्यक असेल तर तुम्ही जा. छळामुळे त्रस्त होऊन मी त्यांना म्हटले की, तुझा सर्वनाश होईल. जेव्हा जन्म आणि मृत्यू होतो तेव्हा सव्वा महिना सुतक असते. ठीक सव्वा महिन्यानंतर करकरेंना अतिरेक्यांनी ठार केले.’ 


संध्याकाळी म्हणाल्या...
‘ते (हेमंत करकरे)अतिरेक्यांच्या गोळीने मेले. ते निश्चितपणे शहीद आहेत. मी त्यांचा सन्मान करते. वक्तव्य मागे घेते. माफी मागते. ही माझी खासगी वेदना होती.’

 

आयपीएस असोसिएशनचे वक्तव्य- टिप्पणी अपमानजनक

अशाेक चक्राने सन्मानित आयपीएस अधिकारी स्व. हेमंत करकरे यांनी अतिरेक्यांशी लढताना सर्वोच्च बलिदान दिले आहे. एका उमेदवाराच्या अपमानजनक वक्तव्याचा आम्ही सर्व जण निषेध करतो. - आयपीएस असाे.

> काँग्रेसची टिप्पणी-प्रज्ञा यांच्या वक्तव्याने भाजपचे चरित्र समजते. जनतेला त्यांचा राष्ट्रवाद समजलाय.

 

एटीएस प्रमुख होते करकरे, अशाेक चक्र मिळाले होते

हेमंत करकरे १९८२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. मालेगाव स्फोटाची चौकशी करत होते. २६/११ च्या रात्री तीन गोळ्या लागल्यानंतर ते शहीद झाले होते.निवडणूक आयोगाने प्रज्ञा यांच्या वक्तव्याची चौकशी सुरू केली

> निवडणूक आयोगाने प्रज्ञा यांच्या वक्तव्याची चौकशी सुरू केली
> २४ तासांत मागितली माफी : देशाच्या शत्रूला माझ्या वक्तव्याने फायदा होईल, याची जाणीव झाल्यामुळे वक्तव्य मागे घेतेय : प्रज्ञा 

बातम्या आणखी आहेत...