आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डासांपासून आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी हे उपाय करा, यामुळे मलेरिया आणि डेंग्यूपासून होईल बचाव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क - पावसाळ्यात मलेरिया आणि डेंग्यू सारख्या आजाराचे प्रमाण वाढते. डासांच्या चावण्यामुळे ताप येऊन जीवाला धोका उद्भवू शकतो. लहान मुले कोणत्याही आजाराच्या विळख्यात लगेच सापडतात. सध्या वातावरणातील बदल आणि प्रदूषण वाढल्यामुळे डासांची समस्या वाढली आहे. अशात तुमच्या घरी लहान मुले असतील तर त्यांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आम्ही तुम्हाला लहान मुलांचा डासांपासून कसा बचाव करावा याबाबत सांगत आहोत.  

 

> घरामध्ये कापुराचा धुर करा. यामुळे घरातील डास निघून जातील. कापूर हे कापूर स्टँडमध्येच जाळा यामुळे ते जास्त वेळ जळत राहील आणि त्याचा परिणाण दिसेल. 


> डास नेहमीच उग्र वासापासून दूर पळतात. यामुळे तुम्ही कांदा आणि लसूनचा रस पाण्यात मिसळून स्प्रेच्या बाटलीत भरा. नंतर पूर्ण घरात ते शिंपडा. काही वेळानंतर घरात डास राहणार नाहीत. 

 

> मोहरीच्या तेलात ओवा पावडर टाकून जाळा. याच्या धुरामुळे डास पळून जातात. सोबत ते तुमच्या मुलांसाठी सुरक्षित आहे. 


> डासांपासून बचाव करण्यासाठी क्रीम, रोल-ऑन स्टीक, वाइप्स, लोशन मॉस्क्यूटो रेपेलेंट मशीन यांचा उपयोग करू शकता. याचे अनेक फायदे आहेत. हे उत्पादने घरात आणि घराबाहेर दोन्ही ठिकाणी मुलांना डासांपासून सुरक्षित ठेवतात. यातील अनेक तर केव्हाही वापरता येतात. 

 

> दोन महिन्यांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांसाठी डीईईटी, पिकारिडिन सारखे तत्वे असलेल्या उत्पादनांचा उपयोग करा.