वॉक आउट / यशराज फिल्म्सला झटका, फ्लोअरवर येण्यापूर्वीच सैफ अली खानने सोडला चित्रपट 'बंटी और बबली 2'

आधी अभिषेक बच्चनने ठोकरली होती चित्रपटाची ऑफर

Sep 22,2019 02:59:57 PM IST

बॉलिवूड डेस्क : सैफ अली खानने यशराज फिल्म्सचा चित्रपट 'बंटी और बबली 2' करण्यास नकार दिला आहे. हैराण करणारी गोष्ट ही आहे की, काही दिवसांपूर्वी त्याने हा चित्रपट स्वीकारला होता. रिपोर्ट्समध्ये चित्रपटाशी निगडित एका सूत्राने सांगितले की, "सैफ अली खानने मागच्या आठवड्यात चित्रपट न करण्याचा निर्णय घेऊन मेकर्सला झटका दिला आहे."


अभिषेक बच्चनने ठोकरली होती ऑफर...
सूत्रांनी सांगितले, "यशराज फिल्म्स आधी या चित्रपटात अभिषेकला घेऊ इच्छित होते. पहिल्या पार्टमध्ये काम केले होते. त्यामुळे दुसऱ्या पार्टमध्ये सेकंड लीड रोलसाठी तो एकदम फिट बसत होता. तर लीड रोलमध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ असतील. मात्र अभिषेक चित्रपटाबद्दल एक्सायटेड दिसला नाही आणि त्याने चित्रपटाला नकार दिला. यानंतर वायआरएफने सैफ अली खानला अप्रोच केले. त्याला चित्रपटाची कथा आवडली होती चित्रपट करण्यासाठी तो तयारदेखील झाला होता."


मेकर्सला शोधावे लागेल रिप्लेसमेंट...
सूत्रांनीही सांगितले की, चित्रपट लवकरच फ्लोअरवर येणार होता. पण ऐनवेळी सैफने चित्रपट सोडल्याचा निर्णय घेतल्यामुळे मेकर्स संकटात सापडले आहेत. आता त्यांना सैफची रिप्लेसमेंट शोधावी लागेल. सैफने चित्रपट का सोडला ? याचे कारण अद्याप समोर आले नाही. त्याने यशराजसोबत 'हम तुम', 'सलाम नमस्ते', 'ता रा रम पम', 'थोडा प्यार थोडा मॅजिक', 'रोडसाइड रोमियो' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.


'बंटी और बबली' 2005 मध्ये रिलीज झाला होता, ज्यामध्ये अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी लीड रोलमध्ये होते आणि अमिताभ बच्चन यांनी सपोर्टिंग रोल केला होता. शाद अलीच्या डायरेक्शनमध्ये बनलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले होते.

X