आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका कुटूंबातील 5 लोकांनी एकाचवेळी केली आत्महत्या, पाश्चाताप आणि एका भितीमुळे संपुर्ण कुटूंबाने मृत्यूला कवटाळले, 3 जणांचा मृत्यू, 2 गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सागर न्यूज: एकाच कुटूंबातील तीन लोकांनी बुधवारी संध्याकाळी फाशी घेऊन आत्महत्या केली, तर दोघांनी विष खाल्ले. या दोघांची तब्येत आता नाजूक आहे. माहितीनुसार, मृत पुरुषोत्तम पटेल याचे जमीनीच्या वादामुळे मोठा भाऊ शंकर पटेलसोबत मारहाण झाली होती. जखमी शंकर पटेल यांचा उपचारांदरम्यान मंगळवारी रात्री मृत्यू झाला होता. यानंतर पुरुषोत्तम आणि त्याच्या कुटूंबातील लोकांना आत्महत्या केली. एसपी सत्येंद्र शुक्ल, एफएसएल टीमसोबत घटनास्थळी पोहोचले. विष खाल्ल्यामुळे गंभीर झालेल्या पती-पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 

पोलिसांनुसार, सागर जिल्ह्यातील तिखी गावात राहणा-या पुरुषोत्तम(42), त्यांची पत्नी सरोज (37) आणि मुलगा बल्लू (17 )ने घरात फांशी घेतली. पुरुषोत्तमने वेगळ्या खोलीमध्ये आणि आई-मुलाने दूस-या खोलीमध्ये आत्महत्या केली. आई,वडील आणि भावाला फासावर पाहून त्यांचा मोठा मुलगा रामू (22) आणि त्याची पत्नी सीमा (20) यांनीही विष खाल्ले. दोघांना जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी जवळपास 5 वाजेची आहे असे बोलले जातेय. 

 

हत्येची तक्रार दाखल होण्याच्या भितीने केली आत्महत्या 
मृतक पुरुषोत्तमजवळ 5 एकर जमीन होती. त्याच्यावर मोठा भाऊ शंकरची दिड एकर जमीनीवर कब्जा केल्याचा आरोप होता. याच कारणांमुळे दोघांमध्ये सोमवारी मारहाण झाली. रहली पोलिसांनी काउंटर केस दाखल केली होती. शंकरवर जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मंगळवारी उशीरा रात्री त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी गावात हे वृत्त पसरले आणि मारहाणीच्या प्रकरणात आरोपी पुरुषोत्तम, बल्लू आणि रामूविरुध्द हत्येचा गुन्हा दाखल केला जाणार होता. हत्येच्या केसमध्ये अडकणार या भितीने पुरुषोत्तमने आत्महत्या केली. यानंतर त्याची पत्नी आणि मुलाने फांशी घेतली आणि मोठा मुलगा आणि सुनेने विष खाल्ले. पुरुषोत्तमने आपल्या भावाची हत्या केल्यानंतर अपराधी वाटल्याने आणि हत्येची केस दाखल होण्याच्या भितीने आत्महत्या केली. 

 

भावाच्या हत्येचा पाश्चाताप आणि त्याच्या कुटूंबाची मानसिक स्थिती पाहून तो कोलमडला 
मंगळवारी रात्री भोपाळवरुन शंकरच्या मृत्यूची बातमी आली. गावात शांतता पसरली. मोठ्या भावाच्या निधनामुळे कुटूंबामध्ये दुःखासोबतच भितीही होती. पुर्ण रात्रभर पुरुषोत्तम विचार करत होता की, त्याच्या कुटूंबाचे काय होईल?  तर दूसरीकडे मोठ्या भावाच्या हत्येचा पाश्चाताप आणि त्याच्या कुटूंबाची मानसिक स्थिती पाहून तो कोलमडला. 

बातम्या आणखी आहेत...