आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटात होत होत्‍या वेदना, एक्‍स-रे मधून समोर आले- आत आहे चाकू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारमध्‍ये एका डॉक्‍टरचा रूग्‍णाच्‍या जीवावर चांगलाच बेतला आहे. जवळपास दीड महिन्‍यापूर्वी जमिनीच्‍या वादावरून काही युवकांमध्‍ये हाणामारी झाली होती. यात एका युवकाचा मृत्‍यू झाला होता तर शोएब नावाच्‍या युवकाच्‍या पोटावर चाकूने हल्‍ला झाल्‍यामुळे तो गंभीररीत्‍या जखमी झाला होता. त्‍यामुळे शोएबला हॉस्पिटलमध्‍ये भरती करण्‍यात आले होते. काही दिवस डॉक्‍टराने त्‍याच्‍यावर उपचार केले आणि 10 जुलैरोजी त्‍याला हॉस्पिटलमधून सुटी देण्‍यात आली. मात्र त्‍यानंतरही पोटात वेदना होत असल्‍याची तक्रार शोएबनी केली.

 

त्‍यामुळे त्‍याला पुन्‍हा हॉस्पिटलमध्‍ये भरती करण्‍यात आले. एक्‍सरेमध्‍ये शोएबच्‍या शरीरात चाकूसारखी वस्‍तू असल्‍याचे निदर्शनास आले. येथील सिव्‍हील सर्जनने अधिक चांगल्‍या उपचारासाठी रूग्णाला दरभंगा मेडिकल कॉलेजमध्‍ये रेफर केले. शोएबच्‍या कुटुंबीयांनी याप्रकरणी सिव्‍हील सर्जनविरोधात डीएम आणि एसपीकडे तक्रार केली आहे. मात्र अद्यापही कोणतीच कारवाई करण्‍यात आली नाही. कुटुंबीयांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...