आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिष्मतीचे राजा होते कार्तवीर्य अर्जुन, भगवान दत्तात्रेयला प्रसन्न करून मागितली 1 हजार भुजा, तेव्हापासून यांचे नाव पडले सहस्त्रबाहु अर्जुन...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्क- आज (14 नोव्हेंबर, बुधवार) राजा सहस्त्रबाहु अर्जुनची जयंती आहे. वाल्मीकिंच्या रामायणामध्ये मिळालेल्या माहितीनुसार, प्राचीन काळात महिष्मती (वर्तमान महेश्वर) नगरचे राजा कार्तवीर्य अर्जुन होते. त्यांनी भगवान विष्णुचा अवतार दत्तात्रेयला प्रसन्न करून 1 हजार भुजांचे वरदान मागितले होते. तेव्हा पासून त्यांचे नाव सहस्त्रबाहु अर्जुन पडले.


रावणला हरवले होते सहस्त्रबाहुने
- एकदा रावण सहस्त्रबाहु अर्जुनला जिंकण्याच्या ईच्छेने त्यांच्या नगरात गेला. नर्मदेची जलधारा पाहून रावणाने तेथे भगवान शिवची पुजा करण्याचा विचार केला. ज्या ठिकाणी रावण पुजा करत होता, त्यापासून काही अंतरावर सहस्त्रबाहु अर्जुन आपल्या पत्नि सोबत जलक्रीडेत मग्न होते. अर्जुनने खेळता खेळता आपल्या हाजार बाहूंनी नर्मदेचा प्रवाह अडवला. रावणने हे पाहिल्यावर त्याने त्याच्या सैनिकांना याचे कारण पाहण्यासाठी पाठवले. 

 

- सैनिकांनी  रावणाला सगळा प्रकार सांगितला. रावणाने सहस्त्रबाहु अर्जुनला युद्धाचे आव्हान दिले. नर्मदेच्या किनाऱ्यावर रावण आणि सहस्त्रबाहु अर्जुनमध्ये  भयंकर युद्ध झाले. युद्धअंती सहस्त्रबाहु अर्जुनने रावणाला बंदी बनवले. जेव्हा ही गोष्ट रावणच्या आजोबा(पुलस्त्य मुनि)ला कळाली तेव्हा, ते सहस्त्रबाहु अर्जुन कडे गेले आणि रावणाला सोडण्याची विनंती केली. सहस्त्रबाहु अर्जुनने रावणाला सोडले आणि त्याच्या सोबत मैत्री केली.


सहस्त्रबाहु अर्जुनने केली ही चुक

- महाभारतानुसार, एकदा सहस्त्रबाहु अर्जुन आपल्या सैन्यासोबत जंगलातुन जात होते. त्या जंगलात ऋषि जमदग्निचे आश्रम होते. सहस्त्रबाहु ऋषि जमदग्निंच्या आश्रमात आराम करन्यासाठी थांबले. ऋषि जमदग्निकडे कामधेनु गाय होती, जी सगळ्या ईछ्चा पुर्ण करत होती. कामधेनुचा चमत्कार पाहून  सहस्त्रबाहुने तिला बळाने मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आश्रमात ऋषि जमदग्निचे पुत्र परशुराम नव्हते. परशुराम जेव्हा आले, तेव्हा त्यांना सहस्त्रबाहु अर्जुनच्या अत्याचाराबाबत कळाले. हे पाहून परशुराम क्रोधित होऊन, खांद्यावर आपले परशु ठेवले आणि माहिष्मती कडे निघाले.

 

भगवान परशुरामांनी केला सहस्त्रबाहु अर्जुनचा वध

- सहस्त्रबाहु सध्या माहिष्मतीच्या मार्गवर होते, की परशुराम त्यांच्याजवळ गेले. परशुराम अपल्याकडे युद्ध करायला येत आहेत हे पाहून सहस्त्रबाहुने त्यांच्या समोर आपले सैन्य उभे केले. परशुरामांनी एकट्याने त्याच्या सर्व सैन्याला मारले. शेवटी स्वत: सहस्त्रबाहु परशुरामां सोबत युद्ध करायला आले. परशुरामांनी त्याच्या हाजार हातांना आपल्या परशुने कापुन टाकले आणि त्यांचा वध केला. याचा बदला घेण्यासाठी सहस्त्रबाहु अर्जुनच्या मुलांनी ऋषि जमदग्निंचा वध केला. आपल्या निर्दोष पित्याच्या हत्तेने क्रोधित होउन परशुरामने 21 वेळा पृथ्वीला क्षत्रिय मुक्त केले होते.

बातम्या आणखी आहेत...