आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sahi Ram Meena Had Posted A Poster Which Says Contact Me If An Officer Asks For A Bribe

\'कोणी लाच मागत असेल तर मला या नंबरवर कॉल करा..\' अशाप्रकाराचा बोर्ड लावला होता तीनशे कोटींचा काळा पैसा जमा करणाऱ्या डेप्युटी कमिश्नरने...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्तोडगड- नारकोटिक्स विभागातील अधिकारी उपायुक्त डॉ. सहीराम मीना याचे लाचप्रकरण सध्या जास्तच गाजत आहे. गंमतीशीर गोष्ट म्हणजे नारकोटिक्स विभागाच्या स्थानिक कार्यालयामध्ये अजुनही एक बॅनर लावलेला आहे. त्या बॅनरमध्ये लिहलेली सुचना पाहून कोणालाही हसू येऊ शकते. त्या बॅनरमध्ये लिहल्यानुसार, जर कोणी लाच घेत असेल तर सबंधिताने या नंबरवर संपर्क साधावा, असे त्या बॅनरमध्ये लिहले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बॅनरवर ज्या अधिकाऱ्यांचे नंबर देण्यात आले आहे त्यापैकी एक नंबर लाच प्रकरणातील दोषी डॉ. सहीराम मीना याचा आहे. त्यामुळे सगळीकडे या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे.

 

सर्वात मोठा पुरावा : पाचशेच्या नोटावर लिहले होते...
एसीबी टीम जेव्हा सहीरामच्या सरकारी निवासस्थानावर पोहचली तेव्हा कनेराचा कमलेश पैसे देऊन बाहेर आला होता. एसीबी टीम निवासस्थानाच्या आत पोहचताच त्यांनी सहीरामची तपासणी सुरू केली. परंतू त्याने साफ नकार दिला. टीमने जेव्हा निवास्थानाची तपासणी केली तेव्हा त्यांना एक पैशांनी भरलेली बॅग दिसली. त्या बॅगेत पाचशेच्या नोटाच्या बंडलवर लिहले होते की 'सहीराम यांना देण्यासाठी एक लाख' 

 

जीएसटीवर लिहली आहे दोन पुस्तके
सहीराम नारकोटिक्स विभागात येण्यापूर्वी आयकर, क्स्टम विजिलेंसमध्ये होता. तो दोन वर्षांआधी  नारकोटिक्समध्ये आला होता. त्याने जीएसटी विषयावर पीएचडी मिळवली होती. त्यानंतर त्याने ब्रिटेन, बेल्जियम, नेदरलॅंडच्या अनेक संस्थांमध्ये काम केले. खास गोष्ट म्हणजे त्याने आतापर्यंत जीएसटीवर दोन पुस्तके लिहली आहे. एका पुस्तकाचे प्रकाशन मागील वर्षी करण्यात आले होते.

 

 

बातम्या आणखी आहेत...