आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटो एडिट करून अश्लील कमेंट केल्याप्रकरणी साहिल खानने 3 जणांविरुद्ध दाखल केली एफआयआर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : चित्रपट 'स्टाइल'मध्ये काम केलेला अभिनेता साहिल खानने तीन लोकांविरुद्ध पोलिसांकडे एफआयआर दाखल केली आहे. झाले असे की, साहिलने आपले सिक्स पॅक्स दाखवत काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्याला काही लोकांनी एडिट करून शेअर केले आणि त्यावर अश्लील कमेंट्सदेखील केल्या.  

 

आयटी अॅक्ट आणि मानहानीची केस... 
गोरेगांव पोलिसांनी तिन्ही इंस्टाग्राम अकाउंट यूजर्सविरुद्ध एफआयआर दाखल केली आणि त्यांच्यावर आयटी अॅक्टच्या कलमान्वये सोशल मीडियावर अश्लील सामग्री प्रसारित केल्याचा आणि मानहानीचा आरोप केला आहे. 

 

साहिलने शेअर केले फोटो... 
साहिलने आपल्या इंस्टाग्रामवर पोलीस एफआयआरची कॉपी आणि तिन्ही लोकांच्या इंस्टाग्राम अकाउंट्सचे स्क्रीन शॉट्स शेअर केले आहेत.  

 

 

मागच्यावर्षीही वादांमध्ये अडकलेला होता... 
साहिल खान 2018 मध्ये आयशा श्रॉफसोबत कायदेशीर वादांमध्ये फसला होता. साहिलला आयशाने फाइल केलेल्या चीटिंग केसमध्ये आगाऊ जमीन मिळाला होता. पण नंतर हे प्रकरण बंद झाले.  

बातम्या आणखी आहेत...