Home | Gossip | 'Sahoo' trailer released out in four languages, Prabhas and Shraddha Kapoor appear in action scenes

'साहो' चा ट्रेलर चार भाषांमध्ये झाला रिलीज, जबरदस्त अॅक्शन करताना दिसले प्रभास आणि श्रद्धा कपूर 

दिव्य मराठी वेब, | Update - Aug 11, 2019, 12:00 PM IST

खतरनाक गॅंगस्टर्ससोबत भिडत आहे प्रभास

 • 'Sahoo' trailer released out in four languages, Prabhas and Shraddha Kapoor appear in action scenes

  बॉलिवूड डेस्क : प्रभास आणि श्रद्धा कपूर स्टारर 'साहो' चित्रपटाचा ट्रेलर शनिवारी रिलीज केला गेला आहे. ट्रेलर तमिळ, तेलगु, मल्याळम आणि हिंदीमध्ये रिलीज केला गेला आहे. ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे. याव्यतिरिक्त प्रभास आणि श्रद्धा यांच्यामधील केमिस्ट्रीही दिसत आहे.

  खतरनाक गॅंगस्टर्ससोबत भिडत आहे प्रभास...
  ट्रेलर पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, प्रभास एक अंडर कव्हर पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे आणि श्रद्धा क्राइम ब्रांचची एक ऑफिसर अमृता नायरच्या भूमिकेत आहे. चित्रपटात एक शहर वार्जेवर राज्य करणारे गॅंगस्टर्स आणि त्यांच्या क्राइम दाखवले गेले आहे. जिथे वेगवेगळ्या गॅंगचे राज्य आहे. हे सर्व गँग्स एका ब्लॅक बॉक्सच्या मागे आहेत, ज्यामध्ये कदाचित खजिना किंवा अशी काही काही वस्तू आहे ज्यामुळे त्यांची शक्ती दुप्पट होईल. या शहरातुन गॅंगस्टरचे राज्य आणि क्राइम दोन्ही संपवण्यासाठी पोलीस ऑफिसर एक प्लॅन तयार करतात आणि मग पाहायला मिळते जबरदस्त अॅक्शन.

  प्रभासने शेअर केला ट्रेलर...

  जबरदस्त आहेत अॅक्शन सीन्स...
  प्रभास एकावेळी तर खूप घाबरलेला दिसतो आहे, पण दुसऱ्याच क्षणी तो अॅक्शन करताना दाखवला गेला आहे. बॅकग्राउंड म्यूझिक आणि अॅक्शन सीन्स उत्तम दिसत आहेत. फाइट सीन्स खूप इंप्रेसिव दिसले. व्हिलन बनलेले जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, नील नितिन मुकेश, मंदिरा बेदी आणि महेश मांजरेकर खूप खतरनाक दिसत आहेत. सुजीतने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

 • 'Sahoo' trailer released out in four languages, Prabhas and Shraddha Kapoor appear in action scenes
 • 'Sahoo' trailer released out in four languages, Prabhas and Shraddha Kapoor appear in action scenes

Trending