आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Sai Manjrekar Was Born 10 Years After Salman's Debut, Katrina Kaif Was Just 5 Years Old

सलमानच्या बॉलिवूड पदार्पणावेळी 5 वर्षांची होती कतरिना, सईचा जन्मही झाला नव्हता

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः मागील आठवड्यात रिलीज झालेल्या सलमान खानच्या 'दबंग 3' चित्रपटातून सई मांजरेकरने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली आहे. सलमानच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणाच्या 10 वर्षानंतर सईचा जन्म झाला होता. 24 डिसेंबर 1998 रोजी सईचा जन्म झाला. बॉलिवूडची हिट सीरिज दबंगद्वारे मोठ्या पडद्यावर झळकलेल्या सईच्या अभिनयाचे समीक्षक आणि प्रेक्षक दोघेही कौतुक करीत आहे. बॉलिवूडमधील बड्या कलाकारांपैकी एक असलेल्या महेश मांजरेकरांची ती मुलगी आहे.

 • जॅकलिन फर्नांडिज

जॅकलिन फर्नांडिज आणि सलमान खान यांनी 'किक' आणि 'रेस 3' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सलमानच्या डेब्यू फिल्म 'बिवी हो तो ऐसी'च्या वेळी जॅकलिन अवघ्या 3 वर्षांची होती. जॅकलिनचा जन्म 11 ऑगस्ट 1985 रोजी झाला होता.

 • अनुष्का शर्मा

अनुष्का शर्माने सलमानच्या सुपरहिट फिल्म 'सुलतान' मध्ये त्याच्यासोबत काम केले आहे. सलमानने पदार्पण केले तेव्हा अनुष्का अवघ्या 4 महिन्यांची होती. 1 मे 1988 रोजी अनुष्काचा जन्म झाला होता.

 • सोनम कपूर

‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात सोनम कपूरने सलमानबरोबर काम केले आहे. 1988 मध्ये सलमानच्या डेब्यू चित्रपटावेळी सोनम 3 वर्षांची होती. सोनमचा जन्म 9 जून 1985 रोजी झाला होता.

 • करीना कपूर

करीना कपूरने सलमानबरोबर 'बॉडीगार्ड' आणि 'बजरंगी भाईजान' सारख्या सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. सलमानच्या डेब्यूवेळी करीना जवळजवळ 8 वर्षांची होती. 21 सप्टेंबर 1980 रोजी करीनाचा जन्म झाला होता.

 • कतरिना कैफ

कतरिना कैफने सलमानबरोबर 'पार्टनर', 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' सारख्या चित्रपटांत काम केले आहे. सलमानच्या डेब्यूवेळी कतरिना कैफ 5 वर्षांची होती. 16 जुलै 1983 रोजी कतरिनाचा जन्म झाला होता.

 • प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्राने सलमानबरोबर 'मुझसे शादी करोगी' आणि 'सलाम-ए-इश्क' या चित्रपटांत काम केले आहे. सलमानने पदार्पण केले तेव्हा प्रियांका 6 वर्षांची होती. प्रियांकाचा जन्म 18 जुलै 1982 रोजी झाला होता.

 • सोनाक्षी सिन्हा

सलमानने सोनाक्षीसोबत 'दबंग' आणि 'दबंग 2' असे सुपरहिट चित्रपट केले आहेत. सलमानच्या डेब्यूवेळी सोनाक्षी साधारण 1 वर्षाची होती. 2 जून 1987 रोजी सोनाक्षीचा जन्म झाला होता.

 • दिशा पाटनी

अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' चित्रपटात दिशा सलमान खानसोबत दिसली होती. दिशाचा जन्म सलमानच्या डेब्यू फिल्मच्या रिलीजच्या सुमारे 4 वर्षांनंतर झाला होता. दिशाचा जन्म 13 जून 1992 रोजी झाला होता.

 • झरीन खान

झरीन खानने सलमानबरोबर 'वीर' चित्रपटात काम केले आहे. झरीन सलमानच्या डेब्यूवेळी फक्त 1 वर्ष 3 महिन्यांची होती. झरीनचा जन्म 14 मे 1987 रोजी झाला होता.

बातम्या आणखी आहेत...