Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Sai Ram's application filed for voter list

मतदार यादीत साईरामचा अर्ज भरणाऱ्यावर गुन्हा; साईबाबांचा फाेटाे वापरून शासनाची दिशाभूल

प्रतिनिधी | Update - Aug 29, 2018, 07:39 AM IST

मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी असलेला नमुना ६ अर्ज 'श्री साईराम'च्या नावे भरून शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याबद्दल

  • Sai Ram's application filed for voter list

    राहाता- मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी असलेला नमुना ६ अर्ज 'श्री साईराम'च्या नावे भरून शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याबद्दल अज्ञात व्यक्तीविरुद्ध राहाता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार माणिकराव आहेर यांनी मंगळवारी याबाबत फिर्याद दाखल केली.


    शिर्डी मतदारसंघात सुरू असलेल्या मतदार नोंदणी व पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत ऑनलाइन वेबसाइटवरून मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे, तसेच नावात दुरुस्ती, पत्ता, वय बदलण्यासाठी विविध फॉर्म भरण्याची सुविधा आहे. शिर्डी मतदारसंघात ऑनलाइन अर्ज मतदान पुनर्निरीक्षण संबंधित वेबसाइट माध्यमातून तहसील कार्यालयाला अर्ज प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या नमुना ६ अर्जामध्ये नाव साई, वडिलांचे नाव राम व साईबाबांच्या फोटोची प्रतिमा वापरत इतर माहिती निरंक ठेवून नाव समाविष्ट करण्याचा अर्ज केला. त्यामुळे संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

Trending