आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासई ताम्हणकर नेहमी नव-नवे ट्रेंड्स घेऊन येत असते. बाकी स्टार्स जे करत नाही, ते काहीतरी वेगळं करण्याचा विचार सई करते. मालिका-चित्रपटाचे क्षेत्र पदाक्रांत केल्यावर सईने एक कुस्ती टिम खरेदी केली. त्यानंतर ती आता लवकरच एका वैबसीरिजमधूनही दिसणार आहे. आता नवी वाट शोधायची हॅट्रिक मारत सई तिसरी नवी गोष्ट करतेय. ती म्हणजे स्टॅंड-अप कॉमेडी.
सूत्रांच्या अनुसार, स्टँड-अप कॉमेडी क्षेत्रात आजपर्यंत कोणी सुपरस्टारने प्रवेश केला नाही. नवे कलाकराचं ह्या क्षेत्राकडे वळतात. आणि ह्या क्षेत्रात नाव कमावल्यावर मग ते अभिनय़ क्षेत्राकडे जातात. पण सईच हेच तर वैशिष्ठ्य आहे. तिला नाविन्याची ओढ आहे. आणि म्हणूनच ती काहीतरी नवं करायचा विचार करतेय,
सई ताम्हणकरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर नुकताच एक व्हिडिओ अपलोड करत ह्या आपल्या नव्या स्टँडअप कॉमेडीच्या प्रयोगाची माहिती आपल्या चाहत्यांना दिलीय.
सई ताम्हणकर ह्याविषयी म्हणते, "मला स्टॅंडअप कॉमेडियन्सबद्दल आणि ह्या क्षेत्राबद्दल खूप आदर आहे. मी माझ्या करीयरमध्ये काही कॉमेडी सिनेमांमध्ये अभिनयही केला आहे. पण स्टॅंडअप कॉमेडी खूप वेगळी असते. आणि रंगमंचावर लाइव अभिनय करण्याची नशा काही औरच असते. म्हणून हा नवा अनुभव घेऊन पाहायचाय."
रविवारी संध्याकाळी ठाण्यामध्ये सई ताम्हणकर आपला पहिला स्टॅडअप कॉमेडी शो करणार आहे.
View this post on InstagramA post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on Nov 23, 2018 at 11:40pm PST
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.