आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Saifeena Wedding: लग्नाआधीच साजरा केला 500 वेळा हनीमून, करीनाने केला होता खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेता सैफ अली खान आज त्याचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. कधीकाळी फ्लॉप अभिनेता असा शिक्का असलेला सैफ आज 'बॉलिवूडचा नवाब' म्हणून ओळखला जातो. आज करीना कपूरसोबत लग्न करुन सैफ अली खान सुखाचे आयुष्य जगत आहे. करीना आणि सैफ हे टशन या चित्रपटादरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. शाहिदपासून वेगळे झाल्यानंतर सैफ करीनाच्या जवळ गेला होता. या दोघांनी आपले प्रेमप्रकरण कधीची लपवले नाही. नेहमीच बोल्ड आणि बिनधास्त कमेंट करणाऱ्या करीनाने लग्नानंतर हनीमुनला कुठे जाणार या प्रश्नावर सर्वांना चकीत करणारे उत्तर दिले होते. तिने सांगितले होते, "सैफबरोबर लग्नाअगोदरच 500 हनीमून साजरा केला आहे त्यामुळे हनीमुनला कुठे जाणार हा प्रश्न काही खूप खास नाही". 

 

अशी आहे दोघांची लव्ह स्टोरी..

'टशन' चित्रपटाच्या सेटवर सैफ अली खान आणि करीना कपूर यांची पहिली भेट झाली होती. या चित्रपटात जरी त्यांची जोडी नव्हती तरी दोघे एकमेकांसोबत बराच वेळ घालवत असत. हा तोच काळ होता जेव्हा करीनाचे शाहिदसोबत नाते नुकतेच संपुष्टात आले होते. सैफने एका इवेंटदरम्यान करीनासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर करीना असो वा शाहिद त्यांनी नेहमीच एकमेकांसोबत असलेल्या रिलेशनशीपबद्दल मोकळेपणाने चर्चा केली.

 

पाच वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर केले लग्न..

पाच वर्षे डेटींग केल्यानंतर सैफ अली खान करीनाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. बॉलिवूडचे प्रसिद्ध कपूर घराण्याची मुलगी आणि राजघराण्यातील सैफ अली खान यांचे लग्न म्हटल्यावर ते शाही थाटातच असणार याबद्दलच शंका नाही. 16 ऑक्टोबर 2012 रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकले. बॉलिवूडची तमाम सेलिब्रेटी मंडळी आणि राजकारणातील अनेकजणांनी या लग्नात सहभाग होता. यांचा लग्नसोहळा जवळपास एक आठवडा चालला होता.


पुढच्या स्लाईडवर पाहा, करीना आणि सैफ अली खानचा Wedding Album..

बातम्या आणखी आहेत...