आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई: इंडस्ट्रीचा प्रसिध्द डिझायनर मनीष मल्होत्राने स्वातंत्र्य दिवसाच्या पुर्वसंध्येला आपल्या घरात एक पार्टी होस्ट केली. समोर आलेल्या इनसाइड फोटोजमध्ये मनीष मल्होत्रा आणि जान्हवी कपूरची स्पेसल बॉन्डिंग पाहायला मिळाली. मनीष, श्रीदेवीच्या खुप जवळचा होता. श्रीदेवीच्या मुलींविषयी बोलायचे झाले तर बालपणापासून मनीष त्यांच्या फॅमिली मेंबरप्रमाणेच आहे. जान्हवी आणि खुशीसाठी मनीष बालपणापासून ड्रेसेस डिझाइन करतोय. एका मुलाखतीत करण जोहरने सांगितले होते की, मनीष नेहमी जान्हवीविषयी अनेक गोष्टी सांगत होता. जेव्हा 'सैराट' चा 'धडक' रिमेक करायचा होता तेव्हा मनीषने सांगितल्याप्रमाणे मी जान्हवीला कास्ट केले.
सैफची मुलगीही मनीषच्या जवळची
मनीष मल्होत्राने बॉलिवूडमध्ये जवळपास सर्वच अॅक्ट्रेससाठी ड्रेस डिझाइन केले आहेत. अनेक इव्हेट्समध्ये काजोल, प्रियांका, करीना, करिश्मासोबतच सर्वच टॉप अॅक्ट्रेसेस त्याने डिझाइन केलेलेच कपडे घाततात.
- टॉप अॅक्ट्रेसेससोबतच स्टारकिड्सही मनीषचे क्जोल फ्रेंड्स आहेत. पार्टीमध्ये सारा आणि मनीषचीही खास बॉन्डिंग पाहायला मिळाली. सारानेही त्याने डिझाइन केलेले ड्रेसेस घातले आहेत.
- नेहमीच आपली गर्लफ्रेंड दिशा पाटनीसोबत पोहोचणारा टायगर श्रॉय यावेळी एकटाच पोहोचला. तो आपला आगामी चित्रपट 'स्टूडेंट ऑफ द ईयर-2'ची को-स्टार अनन्या पांडेसोबत फोटो क्लिक करताना दिसला.
पार्टीमध्ये वर्स्ट लूकमध्ये पोहोचली काजोल-नेहा
पार्टीमध्ये काजोल वर्स्ट लुकमध्ये दिसली. तिने खुप नॉर्मल आणि अनमॅचिंग जीन्स-टॉप परिधान केला होता. यामध्ये ती खुप लठ्ठ दिसत होती. यासोबतच एकता कपूरही व्हाइट अँड ब्लॅक स्ट्रिप जंपसूटमध्ये पोहोचली तर नेहा धूपिया विचित्र स्कर्ट-टॉपमध्ये पोहोचली होती. दोघींनाही पाहून या पार्टीत आल्या आहेत असे वाटत नव्हते.
हे सेलेब्सही दिसले
- पार्टीमध्ये प्रियांका चोप्रा, नुसरत भरुचा, ईशान खट्टर, जॅकी भगनानी, कृती खरबंदा, पूजा हेगडे, रिया चक्रवर्ती, रवीना टंडन, पुनीत मल्होत्रा, मोहित मारवाह, टायगर श्रॉफ, करण जोहर, कणिका कपूर, अर्पिता खान, आदित्य रॉय कपूर, भूमी पेडनेकर, यूलिया वंतूर, डायना पेंटी, यामी गौतमसोबतच अनेक सेलेब्स पोहोचले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.