आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Saif Ali Khan Daughter Sara Visit Vaishno Devi: Social Media Users Made Is Hindu Muslim Topic But Sara Fan Support Her

नवरात्री: वैष्णव देवीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली सैफ अली खानची मुलगी, शेअर केला व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा नवरात्रीच्या शुभ वेळी वैष्णव देवीच्या दर्शनासाठी पोहोचली. साराने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये ती घोड्यावर बसून माताच्या गुफेकडे दर्शनासाठी जाताना दिसतेय. सारासोबत तिचा एक गाइडही आहे. ज्याच्यासोबत बोलताना सारा माताच्या गुफेविषयी विचारते. गाइड तिला सांगतो की, जे लोक पापी असतात, ते गुफेमध्ये जाऊ शकत नाही. माता राणी असे काहीना काही करते की, ज्यामुळे त्यांना गुफेत त्यांचे दर्शन मिळू शकत नाही. 


साराने चाहत्यांना विचारले - मी दर्शन करु शकते का?
- पापी लोकांना दर्शन मिळत नाही, ही गोष्ट साराला खुप विचित्र वाटते. गाइड म्हणतो की, माता राणीला सर्व माहिती असते. सारा विचारते की?मी पाप केले आहेत की, नाही हे माता राणीला माहिती आहे?
- साराचे हे सर्व बोलणे घोड्यावर बसल्या बसल्या रेकॉर्ड होत होत्या. नंतर हा व्हिडिओ पोस्ट करुन साराने चाहत्यांना विचारले, "कुणी सांगेल का? मी गुहेत जाऊ शकते की नाही?"
- व्हिडिओ समोर येताच सोशल मीडिया यूजर्सने हिंदू-मुस्लिम मुद्दा उचलला. काही फॅन्स म्हणत आहेत की, तु आरामात दर्शन करशील तर काही तिला ट्रोलही करत आहेत.
- एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, "साराची आई अमृता हिंदू आहे, जर ती मंदिरात दर्शन करण्यासाठी जाते तर यात काही वाईट नाही?"
- तर दूसरे सोशल मीडिया यूजर्स म्हणाले, "मुस्लिमही मंदिरात जाऊ शकतात आणि यामध्ये साराचा काय दोष आहे. तसेही सर्व पाप तर वडिल सैफने केले आहेत."

 

या फिल्ममध्ये व्यस्त आहे सारा 
- सारा सध्या आपल्या पुढच्या दोन चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. 'केदारनाथ' अनेक अडचणींनंतर पुर्ण होऊ शकला. तर 'सिम्बा' डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. 
- 'केदारनाथ'मध्ये साराची जोडी सुशांत सिंह राजपूतसोबत आहे. तर 'सिम्बा'मध्ये ती रणवीर सिंहसोबत दिसणार आहे. 
- याच काळात सारा 'कॉफी विद करण'च्या नवीन सीजनमध्ये वडील सैफ अली खानसोबत दिसणार आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...