आरोग्य / साखर, कार्ब्सविना सैफने घटवले 15 किलो वजन

सैफ अली खानने व्यायाम करण्यासोबतच पौष्टिक आहार घेत 15 किलाे वजन कमी केले आहे. सोशल मीडियावरही त्याचा वेट लॉस प्लॅन सध्या चर्चेत आहे. 

Sep 17,2019 12:20:00 AM IST

सैफ अली खानने व्यायाम करण्यासोबतच पौष्टिक आहार घेत 15 किलाे वजन कमी केले आहे. सोशल मीडियावरही त्याचा वेट लॉस प्लॅन सध्या चर्चेत आहे.

त्याचा व्यायाम
तो स्ट्रेचिंग करतो. कार्डियाे एक्सरसाइज आणि वेट ट्रेनिंग त्याच्या व्यायामाचा भाग आहे. शरीर बळकट बनवण्यासाठी तो किकबॉक्सिंग आणि वेट लिफ्टिंग करणे पसंत करतो. तणाव दूर करण्यासाठी योगासने करणे त्याच्या फिटनेस वेळापत्रकात समाविष्ट आहे.

आहार
सैफ ब्रेकफास्टमध्ये स्किम्ड मिल्कसोबत ओट्स आणि सोबत ताजी फळे खाणे पसंत करतो. जेवणामध्ये एक बाउल सलाड खातो आणि रात्रीच्या जेवणात हलका फिलेट स्टीक घेतो. सैफ बाहेरचे खाद्य पदार्थ खाणे टाळतो आणि फक्त घरी तयार केलेल जेवणच करतो. तो स्टॅमिना वाढवण्यासाठी ग्रीन टी पितो.

X