आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनासोबत लग्न केले त्या दिवशी सैफ अली खानला आली होती पहिल्या पत्नीची आठवण, लिहिले होते पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. करण जोहरच्या 'कॉफी विद करण' चॅट शोमध्ये सैफ अली खान आणि लेक सारा खानची जोडी लवकरच येणार आहे. शोमध्ये सैफ-साराने आयुष्यासंबंधीत अनेक सीक्रेट्स ओपन केले. याच वेळी सैफने सांगितले की, करीनासोबत लग्न केले त्या दिवशी त्याने आपली एक्स वाइफ अमृता सिंहला लेटर लिहिले होते. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार सैफने होस्ट करणला सांगितले की, त्याने अमृता सिंहला लेटर लिहिले होते. या लेटरमध्ये त्याने पहिली पत्नी अमृता सिंहला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. अमृताला लेटर पाठवण्यापुर्वी त्याने हे लेटर करीनालाही वाचायला दिले होते. सैफने शोमध्ये सांगितले की, करीना खुप सपोर्टिव्ह आहे आणि तिनेच मला हे लेटर अमृता सिंहला पाठवण्यास सांगितले होते. सैफची मुलगी साराच्या बॉयफ्रेंडविषयीही तो बोलला. तो म्हणाला की, मी त्याला पॉलिटिकल व्ह्यूज, ड्रग्ज आणि पैशांविषयी प्रश्न विचारेल. जर त्याच्याजवळ चांगले पैसे असतील तर तो येऊन साराला घेऊन जाऊ शकतो. 

 

सैफने 12 वर्षे मोठ्या अभिनेत्रीसोबत केले होते लग्न 
- सैफेने वयाने त्याच्यापेक्षा 10 वर्षे लहान असलेल्या करीनासोबत 16 अक्टोबर 2012 मध्ये लग्न केले. करीनापुर्वी त्याने आपल्यापेक्षा 12 वर्षे मोठी असेलेली अभिनेत्री अमृता सिंहसोबत लग्न केले होते. दोघांचे लग्न 1991 मध्ये झाले होते. 13 वर्षे एकत्र राहिल्यानंतर 2004 मध्ये ते दोघं वेगळे झाले. 
- सैफ आणि अमृताची पहिली भेट 'ये दिल्लगी' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. एका फोटोशूटच्या निमित्ताने ते भेटले होते. अमृताने सांगितले होते की, फोटोशूट दरम्यान सैफने अमृताच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा तिने सैफला रागाने पाहिले होते. कारण सैफ त्यावेळी बॉलिवूडमध्ये नवीन होता आणि अमृता त्याच्यापेक्षा खुप सीनियर होती.
- 3 महिन्यांच्या डेटनंतर सैफ आणि अमृताने 1991 मध्ये गुपचूप लग्न केले. कारण दोघांनाही त्यांच्या कुटूंबाच्या रिअॅक्शनची भिती वाटत होती. कारण या दोघांच्या वयामध्ये खुप अंतर होते. अमृता सैफपेक्षा जवळपास 12 वर्षे लहान होती. दोघांनी सांगितले होते की, त्यांनी लग्नाच्या 2 महिन्यांपुर्वीच आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. 
- सैफ आणि अमृताला सारा आणि इब्राहिम नावाचे दोन आपत्य आहेत. अमृतापासून वेगळे झाल्यानंतर सैफने 3 वर्षे स्विस मॉडल रोसा कॅटलानोला डेट केले. पण त्यांचे नाते दिर्घकाळ टिकू शकले नाही आणि त्याचे ब्रेकअप झाले. 

 

बातम्या आणखी आहेत...