आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफची पद्मश्री वादात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सैफ अली खानला मिळालेला ‘पद्मश्री’ पुरस्कार काढून घेतला जाण्याची शक्यता एका दैनिकात नुकतीच वर्तवण्यात येत आहे. मुंबईतील एका न्यायालयात सैफविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यात त्याच्यावर आरोप निश्चित करण्यात आल्याने सरकार या मुद्याचा विचार करत आहे. कलाक्षेत्रातील योगदानासाठी सैफला 2010 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला होता. आरटीआय कार्यकर्ते एस. सी. अगरवाल यांनी मार्च महिन्यात केंद्रीय गृहमंत्रालयात तक्रार दाखल करून सैफचा सन्मान काढून घेण्याची मागणी केली होती. सैफ व त्याच्या मित्रांनी दक्षिण आफ्रिकेतील एक उद्योगपती व त्याच्या सासर्‍यांना मारहाण केल्याप्रकरणी खटला सुरू असून मुंबई न्यायालयाने त्यांच्यावर आरोप निश्चित केले आहेत. ‘सैफचा सन्मान काढून घ्यावा’ अशी मागणी शाह यांनी केली होती. यासंदर्भात ‘त्या मुद्द्यावर विचार सुरू असल्याचे’ गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
प्रा. सचिन काशीनाथ ढिकले. रा. पिंपरी सय्यद, ता. जि. नाशिक