आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Saif Ali Khan Reduced Weight By Going To The Gym For 'Sacred Games 2', Followed A Special Diet Plan With A Difficult Exercise Routine

'सॅक्रेड गेम्स 2'साठी जिममध्ये जाऊन सैफ अली खानने घटवले वजन, कठीण एक्सरसाइज रुटीनसोबत विशेष डाएट प्लॅनदेखील केला फॉलो  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : वेब शो 'सॅक्रेड गेम्स' साठी सैफ अली खानचे बरेच कौतुक झाले होते. आता या शोचे दुसरे सीझन 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. सैफ या शोमध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. त्याने याच्या दुसऱ्या सीझनसाठी बरीच मेहनत घेतली आहे. 

 

अनेक तास जिममध्ये घालवले...  
तंदुरुस्त शरीरयष्टी साठी सैफने अनेक तास जिममध्ये घालवले. त्याने यासाठी एक खास व्यायाम आणि आहार चार्ट तयार केला होता. त्यामुळे त्याने अनेक तास व्यायाम करून वजन कमी केले. यासाठी त्याने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आहार घेतला. तो याविषयी म्हणाला, सीझनमध्ये पात्र कमी जेवण आणि औषध घेताना दिसणार आहे. 

 

कथेची होती मागणी...  
या शोच्या पहिल्या भागात सैफ वेगळा दिसला तर या दुसऱ्या सीझनमध्ये तो एकदम वेगळा आणि फिट दिसणार आहे. याचे अनेक कारणं होती, तर जाणून घेऊया त्या कारणांविषयी... 

 

पहिल्या भागात असा दिसला सैफ अली...  
- सरताज सिंहच्या जीवनात अनेक नकारात्मक गोष्टी घडल्या 
- पत्नीपासून वेगळा होतो, संपूर्ण वेळ तणावात दाखवण्यात आला. 
- स्वत:कडे लक्ष देत नव्हता, इन्सोमेनियाने पीडित झाला होता. 

 

या कारणाने दिसणार दुसऱ्या भागात सडपातळ...  
- सरताजला गायतोंडेचे गुपित समोर आणण्याबरोबरच शत्रूसोबतही लढायचे आहे. 
- एक माणूस ज्याचे आयुष्यात काहीच ध्येय नव्हते, तो आता फिट अधिकारी बनून फायटिंग करताना दिसणार आहे. 
- अनेक अॅक्शन दृश्य करायचे होते, त्यासाठी दणकट शरीरयष्टी हवी होती. 

 

पुस्तकातील पात्राप्रमाणे दिसेल सरताज...  
अभिनेता सैफ अली खान म्हणाला, ज्या पुस्तकावर ही वेब मालिका आधारित आहे, त्यात सरताज एकदम तंदुरुस्त आणि हुशार पोलिस अधिकारी दाखवण्यात आला आहे. मात्र सिरीजच्या सुरुवातीला त्याची वाईट परिस्थिती दाखवण्यात आली. त्यामुळे तो स्वत:कडे लक्ष देत नव्हता. त्यामुळे त्याचे पात्र थोडे जाड दाखवले होते. आता मात्र दुसऱ्या सीझनमध्ये तो अॅक्शन करताना दिसणार आहे. पुस्तकात मांडण्यात आले तसेच हे पात्र दिसणार आहे. फिट दिसण्याचा प्रयत्न केला.