आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमूरचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एअरपोर्ट, प्ले स्कूल पासून ते सैफ-करिनाच्या घराच्या बाहेरसुद्धा फोटोग्राफर्स एका फोटोसाठी त्याची वाट पाहात तासंतास उभे राहतात. पण सैफनुसार, त्याच्या मुलाला आता फोटो काढून घेणे आवडत नाही आणि तो यासाठी नकार देणेही शिकला आहे. त्याने हा खुलासा एका मुलाखतीमध्ये केला.
शेजाऱ्यांनी केली होती तक्रार...
झाले असे की, काही दिवसांपूर्वी सैफच्या शेजाऱ्यांनी तक्रार केली होती की, त्याच्या घराबाहेर फोटोग्राफर्सची गर्दी जमा होत असल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होतो. जेव्हा याप्रकरणी पोलिस घरी पोहोचले तेव्हा सैफने फोटोग्राफर्ससोबत बातचीत केली आणि त्यानंतर ते त्याच्या घराबाहेर जास्तवेळ उभे न राहण्यास तयार झाले. एका मुलाखतीमध्ये सैफने हे स्पष्ट केले आणि सांगितले, फोटोग्राफर्सच्या या निर्णयामुळे तो खूप खुश आहे.
सैफनुसार, तैमूर भले फोटोग्राफर्सला पाहून त्यांच्याशी फ्रेंडली होतो, पण त्याला फोटो काढणे फवारे आवडत नाही. यासोबतच त्याने हेदेखील सांगितले की, आता तैमूर फोटोग्राफर्सला 'नो पिक्चर प्लीज' (कृपया फोटो काढू नका) असे म्हणणे देखील शिकला आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर सैफ वेब प्लॅटफॉर्मवर सीरीज 'सॅक्रेड गेम्स' मध्ये दिसला होता. त्याचा आगामी चित्रपट 'लाल कप्तान' 18 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त तो आणखी तीन चित्रपट 'दिल बेचारा', 'जवानी जानेमन' आणि 'तानाजी : द अनसंग वॉरियर' मध्येदेखील दिसणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.