आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईः 16 ऑगस्ट रोजी सौफ अली खान 48 वर्षांचा झाला आहे. सैफची आई शर्मिला टागोरपासून तर त्याची पत्नी करीना, मुलगा तैमूर आणि लहान बहीण सोहा अलीला सर्वच ओळखतात. परंतू सैफला अजून एक बहीण आहे. सबा खान हिच्याविषयी फारसे कुणाला काही ठाऊक नाही. सिनेसृष्टी आणि पेज थ्री पार्टीजपासून कायम दूर राहणारी सबा अली खान 2700 कोटींची मालकिण आहे. फॅमिली फंक्शन वगळता ती सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत नाही. सबा आता 42 वर्षांची असून अद्याप तिने लग्न केलेले नाही.
व्यवसायाने ज्वेलरी डिझायनर आहे सबा...
सबा अली खान ही ज्वेलरी डिझायनर असून तिचा स्वतःचा बिझनेस आहे. काही दिवसांपूर्वीच तिने डायमंड चेन सुरु केली आहेत. इतकेच नाही तर सैफने करीनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सबाला तिच्यासाठी एक सुंदर डायमंड सेट डिझाइन करायला सांगितला होता.
औकाफ-ए-शाहीची प्रमुख आहे सबा...
सबा भोपाळच्या औकाफ-ए-शाहीची प्रमुख आहे. भारत सरकार आणि भोपाळ संस्थानचे तत्कालीन नवाब हमीदुल्ला खां यांच्यात झालेल्या करारानुसार, औकाफ-ए-शाहीवर वक्फ बोर्डचा हक्क राहणार नसल्याचे ठरले होते. नवाब घराण्याची ही एक स्वतंत्र संस्था आहे. सरकारच्या करारानुसार, औकाफ-ए-शाहीचा प्रमुख हा भोपाळच्या नवाब किंवा पतौडी घराण्यातूनच असेल. औकाफ-ए-शाही जवळ कोट्यवधीची संपत्ती आहे.
लाजाळू स्वभावामुळे सिनेमांत आली नाही सबा...
पतौडी घराण्यातील अनेक जण बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. पण सबा सिनेसृष्टीपासून कायम लांब राहिली. याचे कारण म्हणजे तिचा लाजाळू स्वभाव आहे. एका मुलाखतीत स्वतः सबाने सांगितले होते, की कधीही मी सिनेसृष्टीत येण्याचा विचार केला नाही. मी जे काम करतेय, त्यात मी आनंदी आहे.
अद्याप झाले नाही सबाचे लग्न...
41 वर्षीय सबाचे अद्याप लग्न झालेले नाही. ती स्वतंत्रपणे स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहे. औकाफ-ए-शाहीची प्रमुख असल्याने सबा पतौडी घराण्याच्या संपत्तीचा लेखाजोखा ठेवते. सैफ-सोहाप्रमाणे लाइमलाइटमध्ये न येतादेखील ती अतिशय बिझी असते. सबाची बहीण सोहा अली खानचे अभिनेता कुणाल खेमूसोबत लग्न झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.