आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैमूरची लोकप्रियता सैफला करायची आहे कॅश, करीनासोबत आयडिया शेअर केली तर ती भडकली आणि म्हणाली - तुला तुझ्या मुलाला विकायचे आहे का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा चिमुकला लेक तैमूर हा बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. जर तैमूर सैफ आणि करीनासोबत दिसला तर त्या दोघांपेक्षा जास्त चर्चा ही तैमूरचीच होते. तैमूरमुळे त्याची देखभाल करणारी आयासुद्धा आता प्रसिद्ध झाली आहे. अलीकडेच आपल्या  'बाजार' या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दिलेल्या एका मुलाखतीत सैफने तैमूरविषयी एक चकित करणारी गोष्ट सांगितली. सैफच्या मते, तैमूरने कमी वयातच पैसे कमवायला सुरुवात करायला हवी. इतकेच नाही तर सैफने अनेक निर्मात्यांना तैमूरला चित्रपटात घेणार का? असेही विचारले आहे. मुलाखतीत सैफ म्हणाला की, तैमूर कुठल्याही नॅपी पॅडच्या जाहिरातीत काम करुन पैसा कमावू शकतो. 


सैफचे विचार ऐकून करीना भडकली... 
मुलाखतीत सैफने सांगितले, ''जेव्हा मी करीनाला म्हटले की, तैमूर इंटरनेटवर फेमस आहे, तो पैसाही कमावू शकतो. तर माझी ही कल्पना ऐकून करीना माझ्यावर भडकली. करीनाने मला खडे बोल सुनावले. ती म्हणाली की, तू एवढा चीप वागू नकोस, तू तुझ्या मुलाला विकू शकत नाहीस.'' सैफने पुढे सांगितले की, त्याने करीनाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला की, तैमूर जाहिरातींमधून कमावलेल्या पैशांतून काही पैसे त्याच्या शिक्षणावर काही काही पैसे स्वित्झर्लंडमध्ये सुटी घालवण्यावर खर्च करु शकेल. 

 

तैमूरचा बाबा होण्यास उत्सुक आहे रणवीर... 
करण जोहरच्या 'कॉफी विद करन' सीजन 6 च्या दुस-या एपिसोडमध्ये सहभागी झालेल्या रणवीर सिंगने सांगितले की, तो तैमूरचा दिवाना आहे. करणच्या शोमध्ये एक रॅपिड फायर राऊंड होता. त्यामध्ये करणने रणवीरला प्रश्न विचारला की,  सलमान, शाहरुख आणि आमिर या तीन खानांपैकी कुणासोबत काम करण्यास उत्सुक असशील. याचे उत्तर देताना रणवीरने तिघांऐवजी तैमूरचे नाव घेऊन त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. रणवीर म्हणाला, ''मी त्यादिवसाची वाट बघतोय, जेव्हा मी तैमूरसोबत एखाद्या चित्रपटात काम करेल. मला त्याच्या वडिलांची भूमिका साकारायची आहे.''

 

2 वर्षांचा होणार आहे तैमूर...
सैफीनाचा लाडका तैमूर लवकरच दोन वर्षांचा होणार आहे. 20 डिसेंबर 2016 रोजी जन्मलेल्या तैमूरला करीना अभिनेता नव्हे तर क्रिकेटर बनवू इच्छिते. काही दिवसांपूर्व एका अवॉर्ड फंक्शनमध्ये जेव्हा करीनाला तैमूरच्या करिअरविषयी विचारले गेले, तेव्हा ती म्हणाली होती, ''मी नव्हे तर तैमूर त्याच्या आवडीचे करिअर निवडेल. पण त्याला क्रिकेटर बनलेले मला बघायचे आहे."

 

प्ले स्कूलमध्ये जातो 23 महिन्यांचा तैमूर...

करीनाने जून, 2018 मध्ये तैमूरला प्ले स्कूलमध्ये दाखल केले. तैमूरचे हे प्ले स्कूल कम जिम एखाद्या स्टारकिडसाठी तसे स्वस्त  आहे. या किड जिम कम स्कूलची तीन महिन्यांची फीस ही 15 हजार रुपये आहे.  खास गोष्ट म्हणजे आठवड्यातून फक्त एकच दिवस येथे वर्ग भरतो. येथे मुलांना खेळण्यासाठी सर्व इक्यूप्मेंट्स आहेत. 

बातम्या आणखी आहेत...