आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएन्टटेन्मेंट डेस्क: सैफ अली खानने नुकताच त्याचा 48 वा वाढदिवस साजरा केला. त्याचा जन्म 16 ऑगस्ट, 1970 रोजी दिल्ली येथे झाला होता. पटौदी कुंटूबातून असणारा सैफ कोट्यावधींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे. परंतू सैफ आपला मुलगा तैमूरला वारस बनवू शकणार नाही. कारण सैफची प्रॉपर्टी वादात अडकली आहे. त्याची सर्वच स्थावर आणि जंगम मालमत्ता प्रॉपर्टी अॅक्टमध्ये अडकली आहे. या कलमेनुसार जर एखादा एनिमी प्रॉपर्टीवर आपला मुलगा वारस असण्याचा दावा करतो तेव्हा त्याला हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाकडे जावे लागते.
प्रॉपर्टीचे अनेक दावेदार
- भोपाळमध्ये सैफच्या पंजोबांची एकून 5000 कोटींची प्रॉपर्टी आहे. हरियाणा आणि देशाच्या दूस-या भागांमध्येही त्याची कोट्यावधींची प्रॉपर्टी आहे. त्याचे वडील नवाब पटौदींच्या निधनाच्या काही महिने यांची देखरेख शर्मिला टागोरने केली.
- यानंतर त्यांनी ही सर्व जबाबदारी सैफची बहीण फॅशन डिझायनर सबाला दिली. नवाब पटौदीचा वारस अजूनही समोर आलेला नाही. यामुळे त्यांनी आपल्या 3 मुलांना आणि पत्नीला किती प्रॉपर्टी दिली आहे हे स्पष्ट झालेले नाही.
- सैफची पहिली बायको अमृता सिंहला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघंही बालिक आहेत. तर दूसरी बायको करीनाचा मुलगा तैमुर हा प्रॉपर्टीचा तिसरा दावेदार झाला आहे.
सुरुवातीपासून वादात आहे प्रॉपर्टी
नवाब पटौदीची प्रॉपर्टी सुरुवातीपासूनच वादात आहे. भोपाळमध्ये त्याची जास्तीत जास्त जमीन एनिमी प्रॉपर्टी अॅक्टमध्ये अडकली आहे. गृह मंत्रालयातील एनिमी प्रॉपर्टी डिपार्टमेंट या प्रॉपर्टीची दिर्घकाळपासून तपासणी करत आहे. भोपाळचा नवाब हमीदुल्ला खानने त्याच्या संपत्तीचा वारस आपली मोठी मुलगी आबिदाला बनवले होते. ती पाकिस्तानात निघून गेली होती. यानंतर या प्रॉपर्टीवर मधली मुलगी साजिदा सुल्तानच्या कुटूंबाचा कब्जा झाला. सैफ अली खान, हा त्यांचा नातू आहे. म्हणजेच हमीदुल्लाचा पंतू आहे.
हे आहे नवाब खानदान
हमीदुल्ला खां यांना मुलगा नव्हता. मोठी मुलगी आबिदा पाकिस्तानात गेली होती. सर्वात लहान मुलगी राबिया आपल्या सासरी गेली होती. यामुळे मधली(दोन नंबरची) मुलगी साजिदा सुल्तान नवाबची वारस बनली. साजिदा सुल्तानचे लग्न पटौदीचे नवाब इफ्तिखार अलीसोबत झाले होते. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली होत्या. मुलाचे नाव मंसूर अली खां पटौदी होते. सालेहा सुल्तान आणि सबीहा सुल्तान त्यांच्या मुली होत्या. ज्यांचे लग्न हैदराबादमध्ये झाले. मंसूर अली खान पटौदीने अॅक्ट्रेस शर्मिला टागोरसोबत लग्न केले होते. मुलगा असल्यामुळे संपुर्ण संपत्तीचा सांभाळ मंसूर अली खां पटौदीने केला. यानंतर शर्मिला टागोर आणि सैफ अली खान हे सांभाळात आहेत.
1968 मध्ये तयार झाला होता एनिमी प्रॉपर्टी अॅक्ट
- एनिमी प्रॉपर्टी प्रोटेक्शन अँड रजिस्ट्रेशन अॅक्ट 1968 मध्ये तयार झाला होता.
- फेब्रुवारी 2015 च्या एका आदेशामध्ये केंद्र सरकारने हमीदुल्ला खां यांचे वारस सैफ अली खानची आजी साजिदाला सुल्तानला मानले नाही. त्यांची मोठी बहीण आबिदाला वारस मानले. परंतू ती 1950 मध्ये पाकिस्तानात निघून गेली होती.
- केंद्र सरकारने आबिदाच्या प्रॉपर्टीचा हक्क मध्यप्रदेश सरकारला मागितला होता.
- एनिमी प्रॉपर्टी अमेंडमेंट ऑर्डिनेंस 2016 लागू झाल्यानंतर आणि एनिमी सिटीजनच्या नव्या परिभाषेनंतर वारसामध्ये मिळालेल्या अशा प्रॉपर्टीजमधून भारतीय सिटीजंसचा मालकी हक्क संपलेला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.