आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिगारेटच्या व्यसनाने मरता-मरता थोडक्यात वाचला होता सैफ, 11 वर्षांपूर्वी आला होता हार्ट अटॅक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेता सैफ अली खान आज (16 ऑगस्ट) आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. अनेक हिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या सैफने 1992 मध्ये आलेल्या 'परंपरा' या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. पण 2006 मध्ये आलेल्या 'ओमकारा' चित्रपटातील लंगडा त्यागीच्या भूमिकेने त्याला वेगळी ओळख मिळवून दिली. या भूमिकेसाठी त्याला 2007 साली स्टारडस्टचा सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला होता. पण ज्यादिवशी त्याला हा अवॉर्ड मिळाला होता, त्याच दिवशी त्याला हार्ट अटॅक आल्याचे क्वचितच लोकांना ठाऊक असावे. यामागचे कारण सैफला लागलेले सिगारेटचे व्यसन होते. 

 

ही गोष्ट 2007 च्या फेब्रुवारी महिन्यातील आहे. संध्याकाळी अचानक सैफच्या छातीत दुखू लागल्याने त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला हार्ट अटॅक आल्याचे निदान केले होते. सैफला मायोकार्डियल इन्फार्क्शनचा त्रास असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. सैफच्या कुटुंबात अनेकांना हृदयाच्या आजारांचा त्रास आहे, या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे सैफलासुद्धा या आजाराचा धोका आहे. कामाचा ताण आणि स्मोकिंच्या सवयीमुळे हा धोका आणखी वाढतो. 

 

वयाच्या 16व्या वर्षी सैफला जडले होते सिगारेटचे व्यसन...
सैफ 16 वर्षांचा असताना त्याला सिगारेटचे व्यसन जडले होते. खरं तर मित्रांमध्ये कूल लूकसाठी सैफने स्मोक करणे सुरु केले होते, पण हे व्यसनात कधी बदलले हे त्यालाही कळले नाही. मृत्यूच्या दारातून परतल्यानंतर सैफने सिगारेट ओढणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 

 

दिग्दर्शकाने केले होते चित्रपटाबाहेर...
सैफ अली खानने बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी 1991 मध्ये 'बेखुदी' हा चित्रपट साइन केला होता. दिग्दर्शक राहुल रवैलच्या या चित्रपटाच्या फर्स्ट शेड्युलचे शूटिंगसुद्धा सैफने पूर्ण केले होते. पण नंतर सैफचे वागणे अनप्रोफेशनल असल्याचे कारण सांगून राहूल रवैल यांनी त्याला चित्रपटातून बाहेर केले होते. त्यानंतर या चित्रपटात सैफऐवजी कमल सदाना झळकला. तर काजोल चित्रपटाची हिरोईन होती. 

 

पहिली पत्नी 12 वर्षांनी मोठी तर दुसरी आहे 10 वर्षांनी लहान...
'बेखुदी' या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात सैफची भेट अभिनेत्री अमृता सिंहसोबत झाली होती. हळूहळू दोघांचे अफेअर सुरु झाले आणि ऑक्टोबर 1991 मध्ये सैफ-अमृताने लग्न थाटले. लग्नाच्या वेळी सैफ 21 वर्षांचा तर अमृता त्याच्यापेक्षा वयाने 12 वर्षांनी मोठी म्हणजे 33 वर्षांची होती. 13 वर्षे सोबत राहिल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. या दोघांची सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत. अमृतापासून विभक्त झाल्यानंतर सैफने तीन वर्षे स्विस मॉडेल रोसा कैटलानो हिला डेट केले. पण नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. 2007 मध्ये 'टशन' चित्रपटाच्या सेटवर सैफची भेट त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान करीना कपूरसोबत झाली. 5 वर्षे डेटिंग केल्यानंतर 16 ऑक्टोबर 2012 रोजी दोघांनी लग्न केले. या दोघांचा एक मुलगा असून तैमूर त्याचे नाव आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...