आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासैफ अली खानची मुलगी सारा अली खान 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे. फिल्मच्या ट्रेलरला 16 मिलियनपेक्षा जास्त पाहिले गेले आहे. हा चित्रपट 7 डिसेंबरला रिलीज होत आहे. चित्रपटात स्लिम आणि सुंदर दिसणाऱ्या साराला PCOS नावाचा आजार आहे. तिने चित्रपटाच्या प्रमोशनवेळी 'कॉफी विथ करण' मध्ये या गोष्टीचा खुलासा केला.
सारा सध्या PCOS (पॉलीसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम) आजाराने ग्रस्त आहे. लहानपणी याच आजारामुळे तिचे वजन 96 किलो झाले होते. मुली आणि महिलांमध्ये हॉर्मोनल चेंजेसमुळे पोलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम (PCOS) ची समस्या सुरू होते. मागच्या वर्षी स्पेनमधील यूनिव्हर्सिटी ऑफ बार्सिलोनाच्या एका रिसर्चमध्ये समोर आले आहे की, कि PCOS जास्त काळ राहिल्यास इनफर्टिलिटीची समस्या वाढते. ही समस्या 10 पैकी 1 महिलेला होते.
मेदांता दी मेडिसिटी, गुड़गांवच्या डॉ. सभ्यता गुप्ता (MBBS, MD गायनेकोलॉजी, डिप्लोमा गायनेकोलॉजिकल एंडोस्कोपिक सर्जरी) यांनी या आजाराची लक्षणे आणि उपाय सांगितला आहे.
काय आहे PCOS?
हा मुली किंवा महिलांना होणारा आजार आहे. यात अॅस्ट्रोजन आणि प्रोगसेसटोरॉन नावाच्या सेक्स हॉर्मोनची लेव्हल बिघडून जाते. यामुळे ओव्हरीत सिस्ट (गाठ) बनते. हा आजार जेनेटिक असू शकतो, किंवा लठ्ठपणा आणि अनहेल्दी डायट किंवा डायबिटीजमुळे होतो.
या आजाराची लक्षणे
सलग वजन वाढणे, चेहऱ्यावर फोड येणे, अनियमित मासिक पाळी आणि अनलिमीटेड ब्लिडींग, केस गळण्याची समस्या, आवाज घोगरा होणे, डोकेदुखी, स्किन समस्या, वंध्यत्व ही या आजाराची लक्षणे आहेत.
या आजारावरचा उपाय?
डॉ. सभ्यता गुप्ता यांनी सांगितले की, यापैकी कोणतेही लक्षण तुमच्यात आढळल्यास लगेच तुम्ही डॉक्टरकडे जाउन चेकअप करावे. मेडिकल ट्रीटमेंट सोबतच खाण्यापिण्याच्याकडे लक्ष द्यावे.
> रेग्यूलर 10 ते 15 मिनीट एक्सरसाइज करावी.
> डायटमध्ये फ्रूट्स, हिरव्या पाले भाज्या, नट्स, बीन्स आणि कडधान्य खावे.
> मीट, चीज आणि तळलेले पदार्थ खाऊ नये.
> स्मोकिंग आणि ड्रिंक करू नये.
> सलग एकाच जागेवर बसून न राहता इकडे तिकडे फिरावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.