आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Saif Ali Khan's Daughter Sara Seen On The Ramp For The First Time, Appeared In 'India Couture Week 2019'

पहिल्यांदा रॅम्पवर उतरली सैफ अली खानची मुलगी सारा, 'इंडिया कूटुर वीक 2019' मध्ये दिसली साराची मनमोहक अदा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सारा अली खानने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकताच तिची चर्चा सर्वत्र होत आहे. बॉलिवूडमध्ये केवळ दोन चित्रपट आल्यानंतर सारा अली खान चर्चेत आली आहे आणि आता तर तिने रॅम्पवरही डेब्यू केला आहे. सारा अली खानला मन जिंकण्याची कला येते आणि याच्याच जोरावर तिने दिल्ली येथे आयोजित 'इंडिया कूटुर वीक 2019' मधेही सर्वांचे मन जिंकले. सारा अली खान फॅशन डिजायनर फाल्गुनी आणि शेन पीकॉक यांच्यासाठी शो स्टॉपर होती आणि रॅम्पवर तिची स्टाईल खूपच खास होती. 

 

 

सारा अली खान चा रॅम्प वॉक जेवढा खास होता, तेवढेच खास फर्स्ट रोमध्ये बसून तिला चियर करणारे लोक होते. कारण बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि साराचा भाऊ इब्राहिम अली खानदेखील याप्रसंगी उपस्थित होता. कार्तिक आर्यन आणि इब्राहिम सारा अली खानला चियर करताना दिसले. तसेही काही दिवसांपासून सारा अली खान आणि कार्तिक आर्यन बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसत आहेत. दोघांचे फोटो व्हिडिओदेखील सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.