आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुचर्चित 'लाल कप्तान'चे ट्रेलर रिलीज, सैफचा कधीही न पाहिलेला अंदाज पाहून व्हाल थक्क

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - सैफ अली खानचा बहुचर्चित सिनेमा 'लाल कप्तान'चा ट्रेलर मंगळवारी रिलीज झाला. 'लाल कप्तान'च्या या ट्रेलरला 'चॅप्टर वन - द हंट' असे नाव देण्यात आले आहे. या ट्रेलरमध्ये सैफ अनोख्या अंदाजात दिसत आहे. याअगोदर सैफचा असा अंदाज कोणत्याच चित्रपटात पाहायला मिळाला नाही. 'लाल कप्तान'मधील डायलॉग आणि अॅक्शन जबरदस्त आहे. सैफ अली खानच्या लुक बाबत सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. तसेच सैफचा हा लुक 'द पायरेट्स ऑफ द कॅरिबियन्स'चे पात्र जॅक स्पॅरोने प्रेरित असल्याचे बोलले जात आहे.  
 

 

11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार चित्रपट 
सैफ अली खान 'लाल कप्तान'मध्ये नागा साधुची भूमिका निभावणार आहे. या चित्रपटात बदला, धोका आणि ड्रामाचे मिश्रण असणार आहे. इरोज इंटरनॅशनल आणि आनंद एल रॉयच्या कलर येलो प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. 'लाल कप्तान' 11 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवदीप सिंह या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.
 

           

या स्क्रिप्टद्वारे सैफ आपल्या आतील टॅलेंट सर्वांसमोर आणू शकेल
दरम्यान चित्रपटाची गोष्ट मनोरंजक असून यात ड्रॅमेटिक कॅरेक्टर्स देखील आहेत. या चित्रपटाच्या स्क्रिप्टद्वारे प्रतिभावान सैफ अली खान आपल्या आतील टॅलेंट सर्वांसमोर आणू शकेल. असे इरोज इंटरनॅशनलचे मॅनेजिंग डायरेक्ट सुनील लुल्लाने सांगितले. 
 
 
 
 

   

बातम्या आणखी आहेत...