आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैमूरसोबत लंडनमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहेत सैफ-करिना, सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत फोटोज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : करिना कपूर खान आणि सैफ अली खान सध्या आपला मुलगा तैमूरसोबत लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. करिना आणि सैफ आपल्या व्यस्त शेड्यूलवेळ काढून येथे फॅमिली टाइम एन्जॉय करत आहेत.  

 

यूरोपच्या सुंदर लोकेशन्सवर आहेत सैफ-करिना... 
सैफ-करिनाचे लंडन व्हॅकेशनचे फोटोज सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. या फोटोजमध्ये तैमूर आई करिनाच्या कडेवर दिसत आहे. सध्या ही जोडी इटलीच्या टस्कनीमध्ये आहे. त्यांचे फोटोज पाहून वाटते आहे की, त्यांचे व्हॅकेशान आणखी जास्त दिवस चालणार आहे. ही जोडी यूरोपच्या आणखी काही सुंदर जागांवर वेळ घालवणार आहे.  

 

आई करिनाच्या कडेवर दिसला तैमूर... 
एका फोटोमध्ये करिना फ्लॉरल प्रिंट ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्या कडेवर असलेल्या तैमूरने हिरव्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. तैमूर आपल्या आईच्या  कडेवर खूप क्यूट दिसत आहे. तसेच सैफदेखील कूल लुकमध्ये दिसला.  

 

सुट्यांनंतर 'अंग्रेजी मीडियम'चे शूटिंग करणार आहे करिना... 
हॉलिडे संपल्यावर करिना इरफान खान स्टारर फिल्म 'अंग्रेजी मीडियम' चे शूटिंग सुरु करणार आहे. करिना लंडनमध्येच चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलसोबत जोडली जाणार आहे. या चित्रपटात ती पोलीस ऑफिसरच्या रोलमध्ये दिसणार आहे.  

 

तीन चित्रपटांसोबत काम करणार आहे सैफ... 
सैफ अली खानने अशातच वेब सीरीज 'सॅक्रेड गेम्स 2'चे शूटिंग संपवले आहे. लवकरच तो चित्रपट 'भूत पुलिस'चे शूटिंग सुरु करणार आहे. याव्यतिरिक्त तो 'जवानी जानेमन' आणि अजय देवगनचा ड्रीम प्रोजेक्ट 'तानाजी' मध्येही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.