आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Saif Will Make The Film Based On 'Tandoorkand' Can Play Either Sushil Sharma Or The Investigating Officer's Role

'तंदूरकांड'वर आधारित चित्रपट करणार सैफ, सुशील शर्मा किंवा तपास अधिकारी यापैकी एक भूमिका करू शकतो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'तान्हाजी'च्या यशानंतर आता सैफ अली खान ९० च्या दशकातील प्रसिद्ध खळबळजनक तंदूरकांडावर आधारित चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचे अधिकार बंटी वालियाकडे आहेत. या घटनेवर आधारित चित्रपटात सैफ काम करण्यास तयार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे, परंतु सैफ आरोपी सुशील शर्माची भूमिका करणार की, तपास अधिकाऱ्याची हे मात्र अजूनही ठरले नाही.

काँग्रेसचा नेता सुशील शर्माने १९९५मध्ये त्याची पत्नी नैना साहनीची हत्या करून प्रेताला घराच्या छतावर तंदूरमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला होता. पत्नीचे कोणातरी सोबत संबंध आहे या संशयावरून त्याने तिची हत्या केली होती. या अपराधाबाबत त्याला जवळपास २४ वर्षांची शिक्षा झाली होती. सुशील मागच्याच वर्षी आपली शिक्षा पूर्ण करून जेलमधून बाहेर आला आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर शर्मा म्हणाला होता, माझे आयुष्य एक काेरा कागद आहे आणि मी जेलमधून बाहेर पडलो आहे हे अजूनही मला जाणवत नाही.

'रुस्तम' सारखे दाखवले जाणार कथानक

या चित्रपटाच्या रायटिंग टिम रियल स्टोरीला जसेचे तसे दाखवणार असल्याची चर्चा आहे. 'रुस्तम'मध्ये अक्षय कुमारचे जसे पात्र दाखवले होते तसाच सुशीलच्या गुन्ह्याला कथानक देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अक्षयच्या पात्रााने हिट ऑफ द मोमंेटमध्ये येऊन आपल्या पत्नीच्या बॉयफ्रेंडला मारले होते. येथेदेखील सुशील शर्मा आवेशात येऊन आपल्या पत्नीची हत्या करतो असे कथानकात दाखवले जाणार आहे. चित्रपटात सुशीलच्या कुटुंबाला काेणत्याप्रकारच्या त्रासाचा सामना करावा लागला हेदेखील दाखवले जाणार आहे.

नकारात्मक भूमिकेला पसंती

माहितीनुसार 'तान्हाजी'मधील सैफच्या नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना आवडली. यापूर्वी 'एक हसीना थी' आणि 'ओमकारा'मधील नकारात्मक भूमिकेला पसंती दिली होती. त्यामुळे ते सुशीलची भूमिका करू शकतात. ट्रेड पंडित आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहात आहेत.