सेलचा एफपीओ लांबणीवर

team divya marathi | Update - May 25, 2011, 11:52 AM IST

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या फोलो ऑन पब्लिक ऑफरसाठी गुंतवणूकदारांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 • sail-fpo

  सेलचा एफपीओ लांबणीवर

  स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या फोलो ऑन पब्लिक ऑफरसाठी गुंतवणूकदारांना आणखी
  प्रतीक्षा करावी लागणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत कोणताही निर्णय
  घेण्यात आला नाही. सध्या शेअर बाजारात अस्थिरता आहे. त्यामुळे योग्य वेळ पाहून याबाबत
  निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष सी. एस. वर्मा यांनी दिली.
  एफपीओ जूनमध्ये आणण्याची शक्यता आहे. पण, यासंदर्भात सेबीकडे कधी अर्ज करणार याबाबत
  निर्णय झाला नाही. यावर्षी सेलच्या शेअरमध्ये २४ टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे कंपनीला
  कोणताही धोका पत्करायचा नाही.

Trending