आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड वर्षापूर्वी नौकानयन; आता तेरणा मध्यम प्रकल्पाचा तळही भेगाळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरासह ढोकी, तेर, कसबे तडवळे व येडशी या ४ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या २०.४४५ दलघमी पाणीसाठा क्षमता असलेला तेर येथील तेरणा मध्यम प्रकल्प कोरडा पडला. २०१७ मध्ये प्रकल्प ओव्हरफ्लो झाला होता. २६ डिसेंबर २०१७ रोजी या प्रकल्पात राज्यस्तरीय नौकानयन स्पर्धाही झाली होती.

 

गेल्या वर्षी (२०१८) तेरणा धरण क्षेत्रात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने धरणात नव्याने पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. २०१७ मधील धरणाच्या पाणीसाठ्यावरच उस्मानाबादची तहान भागली.आता शहरासह परिसरातील गावे पाण्यासाठी आसुसली आहेत.
 

२००३ पासून २०१९ पर्यंत ४ वेळा धरण पूर्ण कोरडे पडले. गेल्या वर्षी (२०१८) पावसाअभावी धरणामध्ये मृतसाठा पातळी ०.८९१ दलघमी होती. त्यानंतरही बेसुमार पाणीउपसा झाल्याने प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. त्यामुळे धरण कोरडे पडले. परिणामी परिसरातील गावांना टँकर सुरू करण्याची वेळ आली.
 

या धरणाची बांधणी १९६६ मध्ये  करण्यात आली. या धरणावर १६५२ हेक्टर जमीन ओलिताखाली आली होती. त्यामुळे हा परिसर हरित पट्टा म्हणून ओळखला जात होता. परंतु,पावसाची कमतरता व सतत धरण कोरडे पडल्यामुळे २०१० पासून एकदाही कालव्याला पाणी आले नाही. त्यामुळे हा हरितपट्टा भकास होऊन गेला. 

 

दोन वर्षांनंतर धरण कोरडे पडल्याने याही वर्षी शेतकऱ्यांना गाळ नेऊन शेतीचे नंदनवन करण्याची संधी निर्माण झाली. यामुळे शेती बहरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...